समय रैनाच्या शोमध्ये स्पर्धकाकडून दीपिका पदुकोणच्या मातृत्वार जोक, नेटकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:05 PM2024-11-19T15:05:18+5:302024-11-19T15:06:40+5:30
दीपिकाच्या मातृत्वाचा डिप्रेशनशी लावला संबंध, कंटेस्टंटच्या जोकवर समय रैनासह सर्वच हसले
कॉमेडियन समय रैना (Samay Raina) प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा त्याला काही विनोदांमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या रागाला सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी त्याने कुशा कपिलाच्या घटस्फोटावरुन तिच्यावर अेक वैयक्तिक जोक केले होते. यानंतर कुशा स्वत: भडकली होती. तसंच नेटकऱ्यांनीही त्याला झापलं होतं. आता पुन्हा एकदा तो अडचणीत आला आहे. दीपिका पदुकोणवर (Deepika Padukone) त्याने केलेला विनोद नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेला नाही. नक्की काय म्हणाला समय रैना?
समय रैना 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये परीक्षक आहे. यामध्ये बंती बॅनर्जी या कंटेस्टंटने दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनची खिल्ली उडवली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले आहेत. "दीपिका नुकतीच आई झाली आहे. बरं झालं, आता तिला सहज कळेल की खरं डिप्रेशन काय असतं. ब्रेकअपनंतरचं डिप्रेशन काय असतं हेही तो सांगतो." असं ती कंटेस्टंट म्हणते. यावर समय रैना आणि इतर परीक्षक,कॉमेडियन तन्मय भट, रघु राम सगळेच हसतात.
आता यावरुन वाद निर्माण झाला आहे. दीपिकाचे चाहते समय रैनाच्या या शोवर टीका करत आहेत. 'कॉमेडीच्या नावाखाली अजून कोणत्या थराला जाल?' अशी कमेंट एकाने केली आहे. तर समय रैनाने या सर्व प्रकारावर नेटकऱ्यांचीच मजा घेतली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर या शोची युट्यूब लिंक पोस्ट करत लिहिले की 'शोला नावं ठेवणाऱ्यांनी कृपया युट्यूबवर जाऊनही कमेंट करा तेवढाच मला फायदा होईल.'
समय रैनाच्या या शोचे अनेक चाहतेही आहेत. विशेषत: समय रैनाचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र काही वेळेला त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे.