"तुमच्या बद्दल किती लिहू...", केदार शिंदेंसाठी लेक सनाने लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 06:23 PM2023-01-16T18:23:48+5:302023-01-16T18:31:30+5:30

आज केदार शिंदे यांचा आज 50 वा वाढदिवस. केदार शिंदे यांची लेक सनाने त्यांच्यासाठी एक स्पेशल पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

Sana Shinde share special post for a father Kedar Shinde | "तुमच्या बद्दल किती लिहू...", केदार शिंदेंसाठी लेक सनाने लिहिली खास पोस्ट

"तुमच्या बद्दल किती लिहू...", केदार शिंदेंसाठी लेक सनाने लिहिली खास पोस्ट

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे ( Kedar Shinde) यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांचं काम उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. लवकरच त्यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आज केदार शिंदे  यांचा आज 50 वा वाढदिवस. केदार शिंदे यांच्यासाठी त्यांच्या लेकीन खास पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सना शिंदे लिहिते, तुमच्या बद्दल किती लिहू आणि काय काय लिहू हे कळत नाही. हॅप्पी ५० बर्थ डे माझं पहिलं प्रेम. तुम्ही माझं गुरू आहात. तुमच्यासारखे महान गुरु सगळ्यांच्या नशीबत नसतो. मला तुमच्यासारखं व्हायचं 
आहे. तुम्ही सर्वोत्कृष्ट बाबा आहात. आय लव्ह यू. मला आशा आहे की तुम्हाला ही माझा अभिमान असले की तुम्ही माझे बाबा आहात. सनाने या फोटोत सोबत लहानपणापासून ते आतापर्यंतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. सनाच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.   

सना शिंदेनं 2004मध्ये अगं माई अरेच्चा या सिनेमात छोट्या मुलीचा छोटासा रोल केला होता. आता सना बरीच मोठी झाली आहे. लवकरच ती 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात झळकणार आहे.  या सिनेमात सना  शाहिरांची पत्नी 'भानुमती कृष्णकांत साबळे' ही भूमिका साकारणार आहे. महाराष्ट्र शाहीर, २८ एप्रिल २०२३ जय महाराष्ट्र!" केदार शिंदेंच्या लेकीला पहिल्यांदाच स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते मात्र खूपच उत्सुक आहेत.

Web Title: Sana Shinde share special post for a father Kedar Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.