सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडलाही 'चकाचक'ची भुरळ; संगिता बिजलानीने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:00 PM2021-12-15T17:00:00+5:302021-12-15T17:00:00+5:30
Sangeeta bijlani: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या संगीता बिजलानी हिने 'अतरंगी रे'च्या चकाचकवर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
'केदारनाथ' (kedarnath) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खानचा (sara ali khan) 'अतरंगी रे' (Atrangi Re) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सारा पहिल्यांदाच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. अलिकडेच या चित्रपटातील 'चकाचक' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. विशेष म्हणजे या गाण्याने सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना भुरळ घातली असून अनेकांनी या गाण्यावर इन्स्टा रिल्स केले आहेत. यामध्येच आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री संगीता बिजलानी (sangeeta bijlani) हिनेदेखील भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या संगीता बिजलानी हिने 'अतरंगी रे'च्या चकाचकवर डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संगीता केवळ तिच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्समधून गाणं एन्जॉय करत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने केलेल्या हावभावामुळे अनेक जण घायाळ झाले आहेत.
दरम्यान, संगीता बिजलानी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून अनेकदा तिच्या जीवनाशी निगडीत काही फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच साराचं चकाचक हे गाणं तुफान गाजत असून मराठीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या गाण्यावर ताल धरला आहे. अलिकडेच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला होता.