बिग बॉसच्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड, प्रेक्षकांनी अचूक ओळखलं! प्रोमो बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 09:14 AM2024-09-08T09:14:43+5:302024-09-08T09:18:50+5:30

हा स्पर्धक बिग बॉसच्या घरातील पहिला वाइल्ड कार्ड. सर्वांना उत्सुकता (bigg boss marathi 5)

sangram chougule is first wild card contestant in Bigg Boss marathi 5 promo viral | बिग बॉसच्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड, प्रेक्षकांनी अचूक ओळखलं! प्रोमो बघाच

बिग बॉसच्या घरात जाणार आज पहिला वाइल्ड कार्ड, प्रेक्षकांनी अचूक ओळखलं! प्रोमो बघाच

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये दरदिवशी नवीन टास्क आणि राडे बघायला मिळतात. बिग बॉसमध्ये या आठवड्यात गणपती स्पेशल भाऊचा धक्का सुरु आहे. काल बिग बॉसच्या घरातून घनःश्याम दरवडेची exit झाली. अशातच आज बिग बॉसमध्ये या सीझनमधील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला आहे. या वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा प्रोमो रिलीज झाला असून प्रेक्षकांनी घरात कोण जाणार याबद्दल अचूक अंदाज लावलेला दिसतोय. 

हा स्पर्धक बिग बॉसमधील पहिला वाइल्ड कार्ड?

'तेरा बाप आया' या गाण्यावर पिळदार शरीरयष्टीचा एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात राडा घालायला सज्ज आहे. त्याविषयीचा प्रोमो रिलीज झाला आहे. दिलदार, मनाचा राजा आणि रांगडा गडी असं वर्णन करत या प्रोमोत वाइल्ड कार्ड स्पर्धक पाठमोरा दिसतोय. प्रेक्षकांनी कमेंट करुन हा स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून तो संग्राम चौगुले आहे, हे ओळखलंय. इतकंच नव्हे तर संग्राम चौगुलेची पत्नी स्नेहल यांनी हा प्रोमो शेअर केला असून संग्राम घरात जाणार यावर शिक्कामोर्तब केलंय. 



 

कोण आहे संग्राम चौगुले?

संग्राम चौगुले हा बॉडीबिल्डर असून त्याने फिटनेसवर केलेली मेहनत तुम्हालाही थक्क करुन सोडेल. संग्रामचे सोशल मीडियावर दीड मिलियन फॉलोअर्स आहेत. संग्रामने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेतला असून अनेक पुरस्कार, मेडल मिळवले आहेत. तो एक व्यावसायिक सुद्धा आहे. त्याने ८५ किलो गटात मिस्टर युनिव्हर्स २०१२ चा किताब पटकावला असून सहा वेळा मिस्टर इंडिया तर पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब मिळवला आहे. संग्राम एका आलिशान जिमचा मालकही आहे. संग्राम बिग बॉसच्या घरात गेल्यावर काय राडा करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: sangram chougule is first wild card contestant in Bigg Boss marathi 5 promo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.