सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 04:37 PM2020-07-19T16:37:36+5:302020-07-19T16:38:31+5:30

एका मुद्यावर भन्साळी आणि आदित्य चोप्रा यांच्या जबाबामध्ये विरोधाभास पाहायला मिळाला.

Sanjay Bhansali didn't contact YRF for Sushant Singh Rajput': Aditya Chopra tells Mumbai Police during interrogation | सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम

सुशांत मृत्यूप्रकरणी संजय लीला भन्साळी व आदित्य चोप्रांनी सांगितली वेगवेगळी ‘कहाणी’, वाढला संभ्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पानी’ हा सिनेमा बंद केल्याने सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता, असा एक आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून यशराजवर केला गेला होता. हा आरोपही आदित्य चोप्रा यांनी नाकारला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या  मृत्यूमागचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत अनेकांची चौकशी केलीय. यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचाही समावेश होता. शनिवारी पोलिसांनी यशराज फिल्म्सचा मालक आदित्य चोप्रा यांचीही चौकशी केली. मात्र यावेळी एका मुद्यावर भन्साळी आणि आदित्य चोप्रा यांच्या जबाबामध्ये विरोधाभास पाहायला मिळाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साळींचे काही दावे आदित्य चोप्रा यांनी फेटाळले आहेत.

सुशांतने यशराज फिल्म्ससोबत कराराने बांधित होता. त्यामुळे ‘बाजीराव मस्तानी’ या आपल्या सिनेमात सुशांतला कास्ट करू शकलो नव्हतो. यासंदर्भात यशराजसोबत चर्चाही झाली होती. मात्र या चर्चेतून काहीही निष्पण्ण झाले नाही, असा जबाब भन्साळींनी पोलिसांना दिला होता. यशराजचे आदित्य चोप्रा यांनी मात्र असेही काहीही नव्हते असे सांगून एकप्रकारे भन्साळींना ‘खोटे’ ठरवले आहे. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये सुशांतला घेण्यासंदर्भात भन्साळींची यशराजसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे आदित्य चोप्रांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर यशराजसोबत करार असताना सुशांतने ‘एमएस धोनी’ हा सिनेमा केला. मग ‘बाजीराव मस्तानी’ का करू शकत नव्हता?असे उलट सवालही आदित्य चोप्रांनी केला.

यशराजने आपल्यासोबतच्या करारामुळे सुशांतला ‘रामलीला’ हा सिनेमा करू दिला नाही, हा आरोपही आदित्य चोप्रा यांनी फेटाळून लावला आहे. रणवीर सिंगने एप्रिल 2012 मध्ये ‘रामलीला’ साईन केला होता.   यानंतर नोव्हेंबरमध्ये सुशांत व यशराज यांच्या करार झाला होता. त्यामुळे यशराजने ‘रामलीला’ काम करण्यास सुशांतला मनाई केली, हा आरोप बिनबुडाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे कळते.
तूर्तास भन्साळी व आदित्य चोप्रा यांच्या जबाबातील ही तफावत बघता, पोलिसांपुढचा पेच वाढला आहे.

‘पानी’वर बोलले आदित्य चोप्रा
‘पानी’ हा सिनेमा बंद केल्याने सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता, असा एक आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून यशराजवर केला गेला होता. हा आरोपही आदित्य चोप्रा यांनी नाकारला. आदित्य चोप्रा आणि ‘पानी’चे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात आलेल्या काही मतभेदांमुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे यशराज फिल्म्सवर सुशांत नाराज होता, असा खुलासा यशराजची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने नुकताच केला होता. मात्र ‘पानी’संदर्भात सुशांतसोबत कुठलाही करार झाला नव्हता, असे आदित्य यांनी स्पष्ट केले. आदित्य चोप्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शकासोबत झालेल्या काही क्रिएटीव्ह डिफरन्सेसमुळे ‘पानी’ बदं झाला. नोव्हेंबर 2015 मध्ये सुशांतचा यशराजसोबतचा करार संपणार होता. त्याआधी त्याला हा करार रिन्यू करण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र त्याने हा पर्याय स्वत: नाकारला होता. दोन्ही पक्षाच्या संमतीने यशराज व सुशांतचा करार संपला होता.  
  
 
 

Web Title: Sanjay Bhansali didn't contact YRF for Sushant Singh Rajput': Aditya Chopra tells Mumbai Police during interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.