संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, Video व्हायरल; गाडीची किंमत माहितेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 09:42 AM2024-07-30T09:42:19+5:302024-07-30T09:42:45+5:30

संजय दत्त महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. नुकतंच त्याने नवी कोरी रेंज रोव्हर ही गाडी घरी आणली आहे.

Sanjay Dutt buys new Range Rover on 65th birthday Watch Video pic | संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, Video व्हायरल; गाडीची किंमत माहितेय?

संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, Video व्हायरल; गाडीची किंमत माहितेय?

 Sanjay Dutt buys Range Rover : बॉलिवूडमध्ये संजूबाबा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt). त्याने  गेल्या सोमवारी २९ जुलै रोजी आपला ६५ वा वाढदिवस (Sanjay Dutt birthday) साजरा केला.  वाढदिवसानिमित्त संजय दत्तवर कुटुंब, मित्र आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. हा वाढदिवस संजय दत्तने आणखी खास बनवला. त्याने स्वत:लाच एक नवीन आलिशान कार भेट दिली. संजय दत्तच्या या नवीन कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


संजूबाबानं एक नवीन आयकॉनिक रेंज रोव्हर कार खरेदी (Sanjay Dutt buys new Range Rover) दिली. या नव्याकोऱ्या कारनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये संजय दत्त स्वतः त्याची नवी कार चालवत असल्याच दिसून आलं. आलिशान अशी काळ्या रंगाची कार ही अगदी स्टायलिश दिसून आली. या कारची किंमत तब्बल ४ कोटी रुपये असल्याचं बोलले जात आहे. 


संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या नवीन सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. DOUBLE ISMART SHANKAR असं या सिनेमाचं नाव आहे. याशिवाय संजय लवकरच अजय देवगण, मृणाल ठाकूर आणि कुब्बरा सैत यांच्यासोबत ॲक्शन-कॉमेडी 'सन ऑफ सरदार २' मध्ये पाहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त, आदित्य धरच्या नव्या सिनेमात तो दिसणार आहे. संजय दत्त गेल्या वर्षी आपल्याला 'जवान' आणि 'लिओ' या सुपरहिट सिनेमांत दिसला. 

Web Title: Sanjay Dutt buys new Range Rover on 65th birthday Watch Video pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.