'या' दोन महत्त्वाच्या कारणांमुळे अमेरिकाला नाही जाणार संजय दत्त, मुंबईतल्या हॉस्पिटलध्येच होणार कॅन्सरवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:36 PM2020-08-29T12:36:21+5:302020-08-29T12:43:54+5:30
संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरशी झुंज देतो आहे.
संजय दत्त फुफ्फुसांच्या कॅन्सरशी झुंज देतो आहे. या आजाराचा त्यावेळी खुसाला झाला जेव्हा कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संजूबाबाचा कॅन्सर चौथ्या स्टेजला आहे. संजय दत्तला पुढीच्या उपचारांसाठी अमेरिकेला जायचे होता पण आता या प्लॅनमध्ये बदल केला जाईल.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, संजय दत्तने आपला निर्णय बदलला आहे आता तो मुंबईमध्येच उपचार घेणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे अमेरिकेला जायचे की नाही या पेचामध्ये तो आहे. तर दुसरीकडे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होते आहे आणि त्याचे प्रमाण वाढते आहे.
फुफ्फुसांमधून काढले 1.5 लीटर पाणी
रिपोर्टनुसार गेल्या दोन आठवड्यापासून लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी संजय दत्तच्या फुफ्फुसांमधून 1.5 लीटर इतके पाणी काढले आहे. डॉ. जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली संजय दत्तवर उपचार होत आहेत, त्यांनी ही हेच सांगितले की संजय दत्त अमेरिकाला जायचे टाळले आहे.
मान्यता दत्तची इमोशनल पोस्ट
मान्यता दत्तने इन्स्टाग्रामवर दोनही मुलांचे फोटो शेअर केले आहे. यात संजय दत्तची दोनही मुलं हसताना दिसतायेत. या फोटो शेअर करताना मान्यता दत्तने लिहिले की, वेळ बदलते आहे. देव तुमच्या शांततेचे रक्षण करो.. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर देईल. #love #grace #positivity #dutts #ganpatibappamorya #beautifullife #thankyougod.' असे हॅशटॅग तिने वापरले आहेत. त्रिशालाने मान्यता दत्तच्या फोटोवर कमेंट करताना हात जोडले आहे.
कॅन्सरचे निदान झाल्यानंतर संजय दत्तला सतावतेय मुलांची चिंता!