बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आज आहे एका सुपरस्टारची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:00 AM2020-04-23T06:00:00+5:302020-04-23T06:00:02+5:30
या अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सुरुवातीला अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. केवळ भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त तिच्या दोन्ही मुलांसोबत सध्या दुबईमध्ये अडकली आहे तर संजय मुंबईत आहे.
मान्यता आणि संजयच्या लग्नाला आता अनेक वर्षं झाले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. पण संजय दत्तने मान्यतासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण मान्यचा दत्तच्या फिल्मी करियरची सुरुवात बी ग्रेड चित्रपटातून झाली होती. तसेच ती अभिनेता निमित वैष्णवसोबत ‘लव्हर्स लाइक अस’ या बी ग्रेड चित्रपटात झळकली होती. संजय दत्तने मान्यताच्या या चित्रपटाचे राइट्स 20 लाखांत खरेदी करत मार्केटमधील या चित्रपटाच्या सीडी आणि डीव्हीडी हटवण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावली होती.
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे जीवन संघर्षमय होते. जेव्हा संजय त्याच्या जीवनातील सर्वात कठीण काळातून जात होता. त्यावेळी मान्यता त्याच्या आयुष्यात आली. संजय दत्तच्या कुटुंबातील लोकांसोबत बऱ्याच लोकांना त्याचं मान्यता सोबतच्या नात्यामुळे खूश नव्हते. मात्र आज एकमेकांवरील प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर बॉलिवूडमधील मोस्ट लविंग कपल्स म्हणून ते ओळखले जातात.
मान्यताचे खरे नाव दिलनवाज शेख असून ती लहानाची मोठी दुबईत झाली. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता हे नवे नाव ठेवले.