किस्सा : ये नीचे बैठा दिखा ना तो...; संजय दत्तनं धमकी दिली अन् ‘देढ फुटिया’ला खुर्ची मिळाली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:16 PM2022-03-24T17:16:20+5:302022-03-24T17:17:14+5:30

Sanjay Narvekar : संजय नार्वेकरने सांगितला ‘वास्तव’च्या सेटवरचा भन्नाट किस्सा

Sanjay Narvekar aka Dedh footiya reminisces his Vaastav days on masaledar kitchen kallakar | किस्सा : ये नीचे बैठा दिखा ना तो...; संजय दत्तनं धमकी दिली अन् ‘देढ फुटिया’ला खुर्ची मिळाली...!!

किस्सा : ये नीचे बैठा दिखा ना तो...; संजय दत्तनं धमकी दिली अन् ‘देढ फुटिया’ला खुर्ची मिळाली...!!

googlenewsNext

मराठी व हिंदी सिनेमे, नाटकं, टीव्ही मालिका अशा सर्व क्षेत्रात लीलया वावरणारा मराठमोळा अभिनेता संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. संजयने अनेक हिंदी सिनेमात काम केलं. पण संजय नार्वेकर म्हटलं की, त्याचा एक हिंदी सिनेमा हटकून आठवतो. त्या सिनेमाचं नाव आहे ‘वास्तव’. (Vaastav)

या चित्रपटात त्याने संजय दत्तच्या (Sanjay Dutt) साईडकिक ‘देड फुटिया’चं (Dedh footiya) काम केलं होतं. आता हे पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे, ‘मसालेदार किचन कल्लाकार’ ( Masaledar Kitchen Kallakar) हा शो. होय, संजय नार्वेकरने नुकतीच या शोमध्ये हजेरी लावली. याचा प्रोमो ‘झी मराठी’ने शेअर केला आहे. यात संजयने ‘वास्तव’च्या शूटींगदरम्यानचा अनुभव सांगितला.

संजय दत्तने तुमच्यासाठी सेटवर खुर्ची मागवली होती, तो किस्सा नेमका काय होता, असा प्रश्न शोची होस्ट श्रेया बुगडेने संजयला केला. यावर हा सगळा किस्सा त्याने शेअर केला.
तो म्हणाला, ‘वास्तव’ सिनेमातील देड फुटिया हा रोल मी करावा अशी महेश सरांची इच्छा होती. मला आठवतं मी रूईया नाक्यावर होतो. तेव्हा मोबाईल नव्हता. पेजर होता. मांजरेकरांनी मला मडच्या बंगल्यावर बोलवलं. असशील तिथून डायरेक्टर या बंगल्यावर ये, असं ते म्हणाले. तासाभरात बाईकने मी गेलो. मग कपडे वगैरे घातले आणि तो सीन केला. त्यावेळी पहिला शॉट झाला की, ते फुटेज लॅबमध्ये जायचं, ते डेव्हलप व्हायचं आणि ते चेक करायचे. ते चेक करायला सगळेच गेले होते. महेश मांजरेकर, संजय दत्त, प्रोड्यूसर...

दुसऱ्या दिवशी त्याच बंगल्यात शूट होतं. मी चहा पित बसलो होतो आणि बाबा (संजय दत्त)येणार होता. चहा घेऊन मी पायर्‍यांवर बसलो होतो. बाबा नेहमीसारखा त्याच्या स्टाईलमध्ये आला. त्यानी सगळ्यांनी हात बित केला आणि माझ्याकडे बघितलं. मग तो परत माझाकडे आला. माझ्याशी हात मिळवला आणि ‘ क्या काम किया है... बहोत अच्छा काम किया...व्हेरी नाईस. मैं महेश को भी बोला. अच्छा है..., असं म्हणत  त्याने मॅनेजरला बोलावलं. ‘इसके आगे ये अगर नीचे बैठा हुआ दिखा तो क्या करूंगा मालूम है ना? उसको खुर्सी मिलना मांगता, चाय मिलना मांगता. ये कभी नीचे बैठा मिलना नहीं चाहिए..., ’असं बाबाने  त्या मॅनेजरला बजावलं आणि त्यादिवसापासून मला सेटवर खुर्ची मिळायला लागली....

Web Title: Sanjay Narvekar aka Dedh footiya reminisces his Vaastav days on masaledar kitchen kallakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.