मोहनिश बहलसोबत आता संजीवनी मालिकेत झळकणार त्याची पत्नी, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 04:35 PM2019-09-03T16:35:52+5:302019-09-03T16:41:15+5:30
मोहनिश बहलच्या पत्नीची लवकरच संजीवनी या मालिकेत एंट्री होणार आहे.
संजीवनी या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत मोहनिश आणि गुरदीप कोहली हे संजीवनी मालिकेतील दोन जुने चेहरे आणि काही नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. आता या मालिकेच्या टीममध्ये आणखी एका कलाकाराची भर पडणार आहे. मोहनिश बहलच्या पत्नीची या मालिकेत लवकरच एंट्री होणार आहे.
मोहनिश बहलची पत्नी अभिनेत्री आरती बहल आता या मालिकेत डॉ. सिद्धांत माथुर म्हणजेच नमित खन्नाच्या आईची एंट्री होणार असून ही भूमिका आरती साकारणार आहे. या मालिकेत ती मोहनिशची नायिका म्हणून प्रेक्षकांना दिसणार नाहीये. या मालिकेविषयी बॉम्बे टाईम्सशी बोलताना तिने सांगितले की, मोहनिश हा एक खूप चांगला अभिनेता आहे. संजीवनी या मालिकेत मोहनिश जी भूमिका साकारतो, त्या भूमिकेत मी दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याचा विचार देखील करू शकत नाही. माझ्यासाठी आणि मोहनिशसाठी मालिकेची अथवा चित्रपटाची कथा आणि त्याचे दिग्दर्शन कोण करत आहे, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. संजीवनी या मालिकेतील सिद्धार्थच्या आईची भूमिका ही अतिशय रंजक आहे. माझी मुलगी प्रन्युतनने यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. माझे पती मालिकेत काम करत आहेत आणि आता त्याच मालिकेत माझी एंट्री होणार आहे. आमच्या घरातील सगळेच आता इंडस्ट्रीतील आहोत.
आरती ही बॉलिवूडमधील नायिका असून तिने साजन, वास्तव यांसारख्या चित्रपटांमध्ये तर साहिल, जुनून यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
संजीवनी ही मालिका 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेत गुरूदीप कोहली, मिहीर मिश्रा, संजीत बेदी, मोहनिश बहल, इरावती हर्षे, शिल्पा शिंदे, अर्जुन पुंज यांच्या मुख्य भूमिका होत्या. ही मालिका एका रुग्णालयातील डॉक्टरांच्या आयुष्यावर बेतलेली होती. या डॉक्टरांचे आपापसातले मतभेद, त्यांच्या प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळाल्या होत्या. ही मालिका चांगलीच गाजली होती. संजीवनीच्या या नव्या सिझनमध्ये देखील डॉक्टरांची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत असून सुरभी चंदना, सयंतनी घोष आणि नमित खन्ना हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.