Pathaan Controversy : शाहरुखला जिवंत जाळेन अन् आमिर-सलमानला मृत्यूदंड देईन; संत परमहंस आचार्य यांची मुक्ताफळे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 11:54 AM2022-12-21T11:54:00+5:302022-12-21T11:54:39+5:30
Pathaan Besharam Rang Controversy : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.
शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) आगामी सिनेमा ‘पठाण’ने ( Pathaan) रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आणि यावरून वातावरण तापलं. या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीला पाहून अनेक लोक खवळले. हिंदू संघटना या गाण्याविरोधात रस्त्यावर उतरल्या. संसदेतही याचे पडसाद उमटले. आता अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी या वादावर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.
तर शाहरूखला जिवंत जाळेल...
‘पठाण’ चित्रपटात आमच्या भगव्या रंगाचा अपमान केला आहे. आपल्या सनातन धर्माचे लोक या बाबत सातत्याने विरोध करत आहेत. हा सिनेमा म्हणजे जिहाद आहे. हे एक षडयंत्र आहे. त्यामुळे आज आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळले. जर मला जिहादी शाहरुख खान मिळाला तर मी त्याला जिवंत जाळून टाकेन. ‘पठाण’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तर तो पेटवून दिला जाईल. सध्या तर फक्त शाहरुख खानचे पोस्टर्स जाळले आहेत. ज्यादिवशी शाहरूख खान मिळेल, त्यादिवशी त्यालाच जिवंत जाळेल. मी त्याला शोधतोय. तो जिहादी भेटला तर मी त्याची चामडी सोलून काढेन. त्याला भगव्याची इतकी चीड आहे, मी त्याला दाखवेन की, त्याच्या शरीरात वाहणारं रक्त देखील भगवंच आहे. माझ्या आधी कुणी त्याला शोधलं आणि जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. जो कोणी आमच्या सनातनाचा अपमान करेल, त्याला आम्ही सोडणार नाही, असा धमकीवजा इशाराच संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी दिला.
‘I’ll burn #ShahRukhKhan𓀠 alive”
— YSR (@ysathishreddy) December 20, 2022
Can we expect any action on this man for giving such threat statements? Definitely not says the record of #ModiGovt 🙏 pic.twitter.com/hlqRsOtU6J
आमिर, सलमानला धमकी
संत जगतगुरू परमहंस आचार्य इथेच थांबले नाहीत. त्यांनी शाहरूखसोबत आमिर खान व सलमान खानही धमकी दिली. मी तीन नावं लिहिली आहेत. एक तर शाहरूख आहे आणि याशिवाय सलमान खान आणि आमिर खान देखील आहेत. यांच्यासाठी मी मृत्युदंड निश्चित केला आहे, असं ते म्हणाले. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर सर्वांनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.