Sara Ali Khan : "पैसे असतील तर तो मला घेऊन जाऊ शकतो"; सारा अली खानने असं कोणासाठी अन् का म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 04:21 PM2024-11-10T16:21:49+5:302024-11-10T16:54:02+5:30

Sara Ali Khan : सारा अली खानने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी आज बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हे दोघेही खूप लोकप्रिय आहेत. सारा आणि कार्तिकने 'लव्ह आज कल 2' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यातील जवळीक खूप वाढली आणि ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. दोघंही 'लव आज कल 2' च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. तेव्हा साराने कार्तिकला डेट करण्याबाबत हैराण करणारं विधान केलं होतं.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. याच दरम्यान, जेव्हा कपिलने साराला विचारलं, "तू एकदा म्हणाली होती की तुला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे... मग आता काय सुरू आहे?"

यावर सारा अली खानने चकीत करणारं विधान केलं. सारा म्हणाली होती की, जर त्याच्याकडे बँकेत खूप पैसे असतील तर हा मला घेऊन जाऊ शकतो. यानंतर कार्तिक म्हणतो की, अरे, मी तर तुला माझं अकाऊंट दिलं आहे, त्यामुळे तुला सर्वच माहित आहे.

सारा यावर म्हणते, खोटं बोलू नकोस, आता खरं सांग, बँक बॅलन्समध्ये किती शून्य आहेत, तर कार्तिक म्हणतो की, आता खूप वाढले आहेत. त्यावर साराने पुन्हा हो, मग ठीक आहे, जसं माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की, जर तुझ्याकडे पैसे असतील तर तू मला घेऊन जाऊ शकतो.

जेव्हा सारा अली खान करण जोहरच्या शोमध्ये वडील सैफ अली खानसोबत पोहोचली होती. त्यामुळे करणने तिला तिच्या लव्ह लाईफबद्दल विचारलं. त्यानंतर साराने सांगितलं होतं की, तिला कार्तिकला डेट करायचं आहे.

अशा स्थितीत साराच्या जवळ बसलेल्या सैफने तिला अडवलं आणि सांगितलं की, जर त्याच्याकडे पैसे असतील तर तू त्याच्यासोबत जाऊ शकतेस. हे ऐकून सारा आश्चर्यचकित होते आणि म्हणते, अरे बाबा, असं बोलू नका, हे चुकीचे दिसेल.

'लव्ह आज कल 2' नंतर सारा आणि कार्तिक आर्यन अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. मात्र या दोघांनीही या अफेअरच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली नाही.