'या' गंभीर आजाराने त्रस्त आहे सारा अली खान, अशी केली त्यावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 12:01 PM2020-02-12T12:01:47+5:302020-02-12T12:04:49+5:30

सारा अली खानचे जुने फोटो पाहून ती भविष्यात ग्लॅमरस अभिनेत्री होईल असं कोणालाच वाटलं नसेल.

Sara Ali Khan suffers from PCOD | 'या' गंभीर आजाराने त्रस्त आहे सारा अली खान, अशी केली त्यावर मात

'या' गंभीर आजाराने त्रस्त आहे सारा अली खान, अशी केली त्यावर मात

googlenewsNext

अल्पावधीतच जिने आपल्या अभिनयासोबत तिच्या ग्लॅमरस अदांनी रसिकांना भुरळ पाडली ती अभिनेत्री म्हणजे सारा अली खान. सोशल मीडियावरही सतत सक्रीय असून फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच साराने इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला  होता. साराचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत फ्लाइटमध्ये तिच्या मैत्रिणींचा व्हिडिओ बनवत असते या व्हिडीओत अगदी जाड जुड सारा दिसते.

त्यावेळी कमीत कमी साराचं वजन 96 किलो इतके होते. तसेच सारा PCOD  म्हणजे पॉलिसिस्टीक ओवेरियल सिंड्रोम या आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे महिलांचे वजन वाढते. 


हार्मोनल समस्यांमुळे आजार होत असून तो महिलांमध्ये विशेषतः लहान वयातील मुलींमध्ये होतो.  साराचे जुने फोटो पाहून ती भविष्यात ग्लॅमरस अभिनेत्री होईल असं कोणालाच वाटलं नसेल. पण कठोर मेहनत आणि चिकाटीने साराने हे शक्य केलं. करण जोहरच्या चॅट शोमध्ये साराने तिच्या आजाराविषयी खुलासा केला होता.

 


साराने तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होती. त्यावेळी तिचे आवाढव्य वाढलेले वजन पाहून आई अमृता सिंहने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. अमेरिका असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, खाऊ शकता. कारण तिथे विविध चॉईस असतात असं सारानं सांगितलं. चॉकलेटसह तिथे सॅलड मिळते आणि पिझ्झासह प्रोटीनही मिळते. या सगळ्यांमुळेच ती अमेरिकेत असताना वाढलेले वजन कमी केले. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे. 

Web Title: Sara Ali Khan suffers from PCOD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.