सारा तेंडुलकरने लंडन विद्यापीठातून पूर्ण केलं मास्टर्स; किती टक्के गुण मिळवले सचिनच्या लेकीनं?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 02:33 PM2023-11-29T14:33:21+5:302023-11-29T14:37:20+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. सारा तेंडुलकरची जीवनशैली खूपच ग्लॅमरस आहे. ती तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करून सतत चर्चेत असते. अशीच एक पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली असून चाहत्यांना आपल्या शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.
साराने आईप्रमाणे वैद्यकीय विषयात शिक्षण घेतलं आहे. सारा तेंडुलकरने पोस्ट करत मास्टर्स पूर्ण केल्याचे सांगितले. कॅप्शनमध्ये तिने लिहले, 'निकालाचा दिवस...'. साराने लंडनमधून ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.
साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ येथेून झालं. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. 2018 मध्ये लंडनमध्येच साराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते.
सोशल मीडियावर साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या देखील चर्चा जोर धरत आहेत. पण अद्याप साराने यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. पण साराला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.