'सरफरोश'ची २५ वर्ष! आमिर खान- सुकन्या मोनेंची भेट.. म्हणाल्या, 'त्याचं मराठी बोलणं अन्...'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:48 AM2024-05-11T10:48:35+5:302024-05-11T10:52:51+5:30
'सरफरोश' सिनेमाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुकन्या मोने - आमिर खान यांची भेट झाली. बोलता बोलता सुकन्या यांनी सरफरोश 2 बद्दल हिंट दिलीय. (sarfarosh, aamir khan, sukanya mone)
आमिर खानचा 'सरफरोश' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. 'सरफरोश' सिनेमाचं जबरदस्त कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे सिनेमा लोकांच्या चांगलाच लक्षात राहिला. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही खास भूमिका साकारली होती. 'सरफरोश'ला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल मुंबईत एका शानदार इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या इव्हेंटला सुकन्या मोने आणि आमिर खान यांची भेट झाली. या भेटीबद्दल सुकन्या मोने यांनी खास अनुभव सांगितलाय.
सुकन्या मोने यांनी 'सरफरोश' मध्ये आमिरच्या वहिनीची भूमिका साकारली होती. सुकन्या या भेटीविषयी लिहितात, "कालचा दिवस खास होता.... माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असे घडतं होते.... आपण एखादा सिनेमा करतो आणि काही वर्षांनी तो गतस्मृतीत जातो.... पण ' सरफरोष ' हा सगळ्याच दृष्टीने माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय चित्रपट आहे.आमिर खान माझा लाडका अभिनेता त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळणार होती."
सुकन्या पुढे लिहितात, "माझी आणि जॉन Mathew matthan ची पहिली भेट... दिल्लीतले चित्रीकरण.... माझी,सोनालीची आणि स्मिता जयकर ची झालेली घट्ट मैत्री... आम्ही केलेली धमाल.... त्या चित्रपटाला काल २५ वर्षे झाली आणि त्या निमित्ताने @radionasha ने ठेवलेला खास show.... Thank you so much @rotalks .... त्यानिमित्ताने झालेलं re union.... सगळ्या जुन्या आठवणी.... शूटिंग दरम्यान झालेल्या गमती जमती.... इतक्या वर्षांनी सोनालीने मारलेली घट्ट मिठी ... आमिर चे मराठी बोलण,वागण्यातला आपलेपणा,काळजी... मनोज जोशी ची भेट....जॉन आणि आभा चे अगत्याचे आमंत्रण.... जॉन चां साधेपणा... त्याच्या कुटुंबाचा आपलेपणा... भारवून गेले होते. .... पुन्हा पुन्हा भेटत राहू. Waiting for Sarfarosh 2"