सातासमुद्रापार घुमणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’

By Admin | Published: May 22, 2016 01:49 AM2016-05-22T01:49:28+5:302016-05-22T01:49:28+5:30

मराठी माणसानं आपल्या यशाचा झेंडा जगभरात उंचावलाय. परदेशात अनेक मोठमोठ्या पदावर मराठी व्यक्ती विराजमान आहेत. अनेक मराठी कुटुंब परदेशात राहतात.

Satara will travel around 'Garja Maharashtra' | सातासमुद्रापार घुमणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’

सातासमुद्रापार घुमणार ‘गर्जा महाराष्ट्र माझा’

googlenewsNext

मराठी माणसानं आपल्या यशाचा झेंडा जगभरात उंचावलाय. परदेशात अनेक मोठमोठ्या पदावर मराठी व्यक्ती विराजमान आहेत. अनेक मराठी कुटुंब परदेशात राहतात. जगभरातील याच मराठीजनांचं मराठी भाषा, संस्कृतीवरील प्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. निमित्त आहे लंडनमध्ये रंगणाऱ्या 'गर्जा महाराष्ट्र माझा' या भव्य कार्यक्रमाचं.भारतीय संस्कृती परदेशातही नांदावी या उद्देशानं लंडनस्थित हरहुन्नरी कलाकार डॉ. महेश पटवर्धन यांनी 2007 पासून हा कार्यक्रम सुरु केला. काही तरी भव्यदिव्य करण्याच्या इच्छेतून पटवर्धन यांनी सुरु केलेला हा कार्यक्रम यंदा इंडिगो ग्रीनिच इथं रंगणार आहे.साहित्य, संगीत, नृत्य याची मेजवानी लंडनमधील मराठीजनांना या कार्यक्रमातून मिळणार आहे. महेश मांजरेकर, आनंद इंगळे, सुनील बर्वे, संदीप पाठक, भाऊ कदम अशा दमदार कलाकारांचा अभिनय यंदा लंडनच्या रसिकांना अनुभवता येणार आहे. याशिवाय महेश काळे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आणि अजित परब आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. तर अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहेरे आपल्या बहारदार नृत्याने तरुणाईला आकर्षित करतील.

Web Title: Satara will travel around 'Garja Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.