'मिस्टर इंडिया'चा 'कॅलेंडर' काळाच्या पडद्याआड, फिल्मी स्टाईलनेच झालं होतं अभिनयात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 08:47 AM2023-03-09T08:47:12+5:302023-03-09T09:56:21+5:30
सतीश कौशिक यांची श्याम बेनेगल यांच्या 'मंडी' सिनेमात एंट्री कशी झाली यामागची कहाणीही रंजक आहे.
Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोविंदा सोबत मुत्तु स्वामी, पप्पू पेजर सारख्या भूमिका निभावणारे सतीश कौशिक यांचं अभिनय क्षेत्रातील पदार्पणही तितकंच फिल्मी होतं. वर्तमानपत्रात आपलं नाव यावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी ते अभिनेता बनले.
'मंडी'मध्ये एंट्री कशी झाली?
सतीश कौशिक यांची श्याम बेनेगल (Sham Benegal) यांच्या 'मंडी' सिनेमात एंट्री कशी झाली यामागची कहाणीही रंजक आहे. कपिल शर्मा शो मध्ये त्यांनी याविषयी सांगितले होते. ते म्हणाले, 'त्यावेळी मला किडनी स्टोन होता. मी रुग्णालयातून एक्स-रे करुन येत असताना मला श्याम बेनेगल यांचा फोन आला. त्यांनी माझा फोटो मागितला. माझ्याजवळ फोटो नव्हता आणि फोटो पाहून ते मला कास्ट करणार नाहीत हे मला माहित होतं. मी जरा विषय वळवला. मी त्यांनी म्हणलं माझ्याकडे फोटो तर नाहीए पण एक्स-रे रिपोर्ट नक्कीच आहे.मी आतून खूप चांगला आहे. त्यांना यावर हसू आलं. ते प्रभावित झाले आणि मला काम मिळाले.'
सतीश कौशिक हे केवळ अभिनेते नाही तर दिग्दर्शक आणि लेखकही होते.. 'जाने भी दो यारो'साठी त्यांनी मजेदार डायलॉग लिहिले. तर दिग्दर्शक म्हणून त्यांचा 'रुप की रानी चोरो का राजा' हा पहिलाच चित्रपट होता जो सुपरहिट ठरला. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडियाचा 'कॅलेंडर' आणि दीवाना मस्तानाचा 'पप्पू' या भूमिकांमुळे ओळखले जाते.
नीना गुप्ता यांच्याशी लग्न करायचे होते
नीना गुप्ता या वेस्ट इंडिजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. नीना गुप्ता या गरोदर राहिल्या. मात्र विवियन रिचर्ड्स त्यांच्याशी लग्न करणार नव्हते कारण ते विवाहित होते. तेव्हा सतीश कौशिक यांनी नीना गुप्ता यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अभिनेत्रीने त्यांना नकार दिला.
२ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर खचले होते सतीश कौशिक; १६ वर्षांनी पुन्हा बनले वडील
सतीश कौशिक यांनी दिल्लीतील गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयात आज अखेरचा श्वास घेतला. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत मुंबईत आणण्याची शक्यता आहे.