ऑस्करच्या ज्युरी मेंबर्समध्ये मराठी माणसाची निवड
By Admin | Published: July 1, 2017 11:20 AM2017-07-01T11:20:31+5:302017-07-01T14:10:37+5:30
प्रतिष्ठेच्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराच्या ज्युरी सदस्यांमध्ये उज्जवल निरगुडकर या मराठी माणसाची निवड झाली आहे.
tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - प्रतिष्ठेच्या ऑस्कर चित्रपट पुरस्काराच्या ज्युरी सदस्यांमध्ये उज्जवल निरगुडकर या मराठी माणसाची निवड झाली आहे. ऑस्करच्या लार्ज-क्रिएटीव्ह सायन्स विभागात त्यांची ज्युरी म्हणून निवड झाली असून, या कॅटेगरीमध्ये निवड झालेले ते पहिले भारतीय ठरले आहेत. ग्लोबल मोशन पिक्चर टेक्नोलॉजीमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ऑस्करने उज्जवल निरगुडकर यांची निवड केली आहे. त्यांना कायमस्वरुपी ऑस्करचे ज्युरी सदस्यत्व मिळाले आहे.
उज्जवल निरगुडकर गेल्या 24 वर्षांपासून हॉलिवूडशी संबंधित असून, त्यांनी चित्रपट क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये अमूल्य योगदान दिले आहे. मुंबईच्या युडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरींगची पदवी घेणा-या उज्जवल निरगुडकर यांच्या नावावर अनेक पेटंटस असून, त्यांनी फिल्म प्रोसेसिंगमध्ये स्वत:चे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांनी 2004 मध्ये जी टेक्नोलॉजी आणली त्याचा 2008 पासून बॉलिवूडमध्ये वापर सुरु झाला.
ऑस्करसाठी ज्युरी मेंबर्सची जगभरातून निवड होते. यंदा भारतातून 14 जणांची निवड झाली आहे. यंदा बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, आमिर खान, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, इरफान खान, दिपीका पदुकोन, प्रियांका चोप्रा यांना ज्युरी सदस्यांसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्यावर्षी ऑस्करच्या ज्युरी मेंबर्ससाठी 683 सदस्यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते यावेळी 774 जणांना निमंत्रित करण्यात आले आहे.