ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर स्मृतिदिन

By Admin | Published: November 3, 2016 11:07 AM2016-11-03T11:07:16+5:302016-11-03T15:22:08+5:30

ज्येष्ठ अभिनेते गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा आज ( ३ नोव्हेंबर) स्मृतिदिन.

Senior Actor Sadashiv Amrapurkar Memorial Day | ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर स्मृतिदिन

ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर स्मृतिदिन

googlenewsNext
(जन्म :११ मे इ.स. १९५०; मृत्यू :३ नोव्हेंबर २०१४)
 
- प्रफुल्ल गायकवाड
मुंबई, दि. ३ - ज्येष्ठ अभिनेते गणेशकुमार नरवाडे उर्फ सदाशिव अमरापूरकर यांचा आज ( ३ नोव्हेंबर) स्मृतिदिन. त्यांनीच्या मराठीसह  हिंदी, ओरिया, हरियाणी, भोजपुरी, बंगाली, गुजराती भाषांतील अनेक चित्रपटांत काम केले.
 
११ मे १९५० साली त्यांचा जन्म झाला.शेवगाव तालुक्यातील अमरापूर हे त्यांचे मूळ गाव.  त्यांचे वडील शेती करत. शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोट चालवणे, गाईचे दूध काढणे, जत्रेत बैल पळविणे या सगळ्या गोष्टी अमरापूरकर यांनी बालपणी केल्या होत्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचे काम अमरापूरकर करीत. आपल्या आळंदीला राहणाऱ्या आत्याबरोबर त्यांनी तीन चार वेळेला आळंदी ते पंढरपूर अशी पायी यात्रा केली होती.
 
(ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर कालवश)
 
त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यानी सदाशव अमरापूरकर हे नाव घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'पेटलेली अमावास्या' या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती.
 
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर आदी सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचे जिव्हाळ्याचे नाते होते.
 
अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती.
 
मार्च २०१४ मध्ये होळीच्या उत्सवात पाण्याची नासाडी रोखण्याचा प्रयत्न करीत असताना अमरापूरकर यांना सहा व्यक्तींनी मारहाण केली होती.
 
सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेली मराठी नाटके
काही स्वप्नं विकायचीत
छिन्न
ज्याचा त्याचा विठोबा
यात्रिक
लग्नाची बेडी
हॅन्ड्स अप
हवा अंधारा कवडसा
 
अमरापूर यांनी लिहिलेली/दिग्दर्शित केलेली नाटके
कन्यादान (दिग्दर्शन)
किमयागार (नाट्यलेखन. हे नाटक हेलन केलर आणि तिची शिक्षिका यांच्या जीवनावर आहे.)
 
सदाशिव अमरापूरकर यांची भूमिका असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट
अर्धसत्य (मराठी)
आई पाहिजे (मराठी)
आखरी रास्ता
आँखे
आन्टी नंबर १
इश्क
एलान-ए-जंग
कुली नंबर १
गुप्त
छोटे सरकार
जन्मठेप (मराठी)
झेडपी (मराठी)
नाकाबंदी
पैंजण (मराठी)
बाॅम्बे टाॅकीज 
२२ जून १८९७ (मराठी)
वास्तुपुरुष (मराठी)
सडक
हुकुमत
होऊ दे जरासा उशीर (मराठी)
 
सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
राज से स्वराज तक
डिस्कव्हरी आॅफ इंडिया
 
अन्य गोष्टी
सदाशिव अमरापुरकरांना शिसपेन्सिलीने चित्रे काढायचा छंद होता. एका जपानी शेती शास्त्रज्ञाचे पुस्तक वाचून त्यांनी शेती करायचे ठरविले. त्यासाठी अमरापूरकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशी अर्धा एकर शेतजमीन विकत घेतली होती. तेथे त्यांनी शेताच्या कडेला अनेक झाडे लावली. तीन वर्षे पीक जळून गेल्यावरही प्रयत्न न सोडता ते भुईमुगाची नैसर्गिक शेती करत राहिले आणि चौथ्या वर्षी त्यांनी भरघोस उत्पन्न मिळविले.
 
पुरस्कार
सडक या हिंदी चित्रपटात केलेल्या महाराणी या तृतीयपंथी खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार.
 
३ नोव्हेंबर २०१४ साली त्यांचे निधन झाले. 
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

 

Web Title: Senior Actor Sadashiv Amrapurkar Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.