"एक सांगायचंय...Unsaid Harmony" वर या दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 10:18 AM2018-11-20T10:18:56+5:302018-11-20T10:29:10+5:30

लोकेश विजय गुप्तेनं या सिनेमाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन यांचे अस्खलित मराठी ऐकता ते खरंच अमराठी आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो.

Senior actors appreciate 'ek sangayachay -unsaid harmony | "एक सांगायचंय...Unsaid Harmony" वर या दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव

"एक सांगायचंय...Unsaid Harmony" वर या दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय या सिनेमातून मांडला आहे. 'लाईफ इज ब्युटीफुल' आणि 'बायसिकल थिव्स्' या बाप मुलाच्या नात्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटानंतर मला आवडलेला हा तिसरा चित्रपट आहे असे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले.

आजच्या काळातील खूप महत्त्वाच्या विषयावरचा सिनेमा, प्रत्येक मुलानं आपल्या पालकांसह पहावा असा सिनेमा, समाज आणि कुटुंब म्हणून आपण कुठे जातोय हे दाखवणारा सिनेमा, केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला सिनेमा, खऱ्या अर्थाने आजच्या काळाचा सिनेमा अशा शब्दांत सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी 'एक सांगायचंय...Unsaid Harmony' या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

देवी सातेरी प्रॉडक्शननं या सिनेमाची निर्मिती केली आहे. लोकेश विजय गुप्तेनं या सिनेमाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन यांचे अस्खलित मराठी ऐकता ते खरंच अमराठी आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो. एकंदरीतच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाशी सर्वतोपरीने भिडत आहे.चित्रपटातलं  'हळवा कोपरा....' हे गाणं चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. 

आपल्या आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय या सिनेमातून मांडला आहे. प्रत्येक पालक आणि मुलांनी हा सिनेमा आवर्जून पाहिला पाहिजे, असं ज्येष्ठ अभिनेता पेंटल यांनी सांगितलं. तर आई-वडील म्हणून आपण कुठे चुकतो का, हा महत्त्वाचा प्रश्न हा सिनेमा उपस्थित करत असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी मांडली. 

'लाईफ इज ब्युटीफुल' आणि 'बायसिकल थिव्स्' या बाप मुलाच्या नात्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटानंतर मला आवडलेला हा तिसरा चित्रपट आहे असे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले.

 

मला वाटत कि हा आजच्या काळातला चित्रपट  आहे. हा चित्रपट तुम्हाला अस्वस्थ करतो,शेवटपर्यंत धरून ठेवतो, जाताना तुम्हाला खूप काही देऊन जातो ही या  चित्रपटाची खरी ताकद आहे अशी भावना  अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

लोकेश गुप्तेचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे; पण तसं अजिबातच वाटत नाही. लेखनापासून प्रत्येक बाजू अत्यंत सफाईदारपणे हाताळली गेली आहे, असं अभिनेता, दिग्दर्शक  प्रसाद ओक म्हणाला. लोकेशनं मांडलेला विषय हा आजच्या काळाचा, आजच्या पालकांचा आणि मुलांचा आहे. म्हणूनच तो महत्त्वाचा आहे, असं निर्माता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सांगितलं.

Web Title: Senior actors appreciate 'ek sangayachay -unsaid harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.