अमिताभ बच्चन, अमुपम खेर यांच्यासाठी खास स्क्रीप्ट अन् आम्हाला...', ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 03:47 PM2023-02-19T15:47:17+5:302023-02-19T15:56:12+5:30

तब्बल १३ वर्षांनंतर शर्मिला टागोर 'गुलमोहर' या सिनेमातून कमबॅक करत आहेत.

senior actress Sharmila Tagores displeasure regarding strong roles going to amitabh bachchan anupam | अमिताभ बच्चन, अमुपम खेर यांच्यासाठी खास स्क्रीप्ट अन् आम्हाला...', ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची नाराजी

अमिताभ बच्चन, अमुपम खेर यांच्यासाठी खास स्क्रीप्ट अन् आम्हाला...', ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची नाराजी

googlenewsNext

हिंदी आणि बंगाली सिनेमात दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहेत. तब्बल १३ वर्षांनंतर शर्मिला टागोर 'गुलमोहर' या सिनेमातून कमबॅक करत आहेत. मात्र त्यांना सध्याच्या सिनेसृष्टीबाबत एक खंत वाटत आहे.आता फिल्म इंडस्ट्रीत त्यांच्या वयाच्या अभिनेत्रींना दमदार भूमिका दिल्या जात नाहीत.

शर्मिला टागोर यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थाला मुलाखत दिली असता त्या म्हणाल्या,'बॉलिवूडमध्ये अजुनही वय बघितले जाते. खासकरुन महिलांसोबत हे घडते कारण दमदार भूमिका पुरुषांकडेच जातात. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अनुपम खेर (Anupam Kher) यांच्यासह अनेक अभिनेत्यांसाठी 'स्पेशल स्क्रीप्ट' लिहिली जाते. पण हेच वहिदा रहमान (Wahida Rehman) यांना दिली जात नाही किंवा अन्य ज्येष्ठ अभिनेत्रींना दिली जात नाही. सिनेमा समाजा आरसा दाखवतो. पण इकोनॉमिकली सुद्धा विचार करावा  लागतो.मान्य आहे तुम्हाला प्रेक्षकांना खेचून आणायचं आहे पण आधी कोंबडी आली की अंडं ? याचा निर्णय करण्याची गरज आहे. पण आता गोष्टी बदलत आहेत. खूप उत्तम कलाकार पुढे येत आहेत.

त्या पुढे म्हणाल्या, 'आता देखील अनेक कमाल कलाकार इंडस्ट्रीत आहेत जसे की नीना गुप्ता. ओटीटी वर टॅलेंटचा खजिनाच आहे. थोडा वेळ लागतो पण हा माहोल ही बदलेल.'

'गुलमोहर' या आगामी सिनेमात शर्मिला टागोर यांनी मनोज वाजपेयी यांच्या आईची भूमिका केली आहे. ही  एका सामान्य परिवाराची गोष्ट असणार आहे. ३ मार्च रोजी गुलमोहर हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

Web Title: senior actress Sharmila Tagores displeasure regarding strong roles going to amitabh bachchan anupam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.