सिरियल किलर्सची हॉरर स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2016 05:16 AM2016-02-06T05:16:39+5:302016-02-06T10:46:39+5:30
सात जणांचा बळी घेणारा ऐलिन वुर्नस म्हणाला होता की, हे जग फार दुष्ट आहे आणि माझ्यातील दुष्टपणा केवळ आजूबाजूच्या ...
मात्र, बहुतांश सिरियल किलर्स एकदम चलाख आणि हुशार असतात. चार्लस् शोभराज ऊर्फ बिकीन किलर हाही त्यातलाच एक. त्याच्या जीवनावर आधारित 'मैं और चार्लस्' हा चित्रपट आज प्रदश्रीत झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जगातील चलाख सिरियल किलर्सवर एक नजर..
चार्लस् शोभराज ऊर्फ बिकिनी किलर
१२ पेक्षा जास्त विदेशी महिला पर्यटकांना ठार मारणार्या चार्लस् शोभराज त्याच्या चार्मसाठी प्रसिद्ध आहे. जेलमध्येसुद्धा महिलांच्या आकर्षणाचा तो केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये शिक्षा भोगत असताना त्याच्या वकिलाच्या मुलीशी त्याने विवाह केला. आज रिलिज झालेल्या 'मैं और चार्लस्'मध्ये त्याची हीच थरारक कथा दाखविण्यात आली आहे
रिचर्ड रॅमरिझ ऊर्फ नाईट स्टॉकर
वयाच्या २९ वर्षी रिचर्डने १३ खून केलेले होते. त्याच्यावर १३ खून, ५ हत्येचे प्रयत्न, ११ लैंगिक अत्याचार, १४ चोर्यांचे आरोप होते. इतके असूनही एका मुलीने त्याला ३ वर्षांमध्ये ७५ प्रेमपत्र लिहले होते आणि अखेर तिच्याशीच त्याने लग्न केले.
टेड बंडी
इतिहासातील सर्वात चार्मिंग सिरियल किलर म्हणून टेड बंडी याचे नाव घेतले जाते. ३0 पेक्षा जास्त महिलांचा बलात्कार आणि खून केल्याचे त्याने कबूल केले होते. हाताला खोटे प्लास्टर बांधून तो महिलांकडे मदत मागायचा आणि मग निर्जनस्थळी नेऊन त्यांची हत्या करून मृतदेहावर बलात्कार करायचा. त्याच्यात मृतदेहाशी सेक्स करण्याची विकृती होती.
पॉल जॉन नॉव्हेल्स ऊर्फ कॅसानोव्हा किलर
दिसायला अतिशय देखण्या पॉलची ओळख कॅसानोव्हा किलर अशी आहे. १९ व्या वर्षी तो चोरीच्या आरोपाखाली प्रथम जेलमध्ये गेला होता. आणि तेव्हापासून मग दरवर्षी सहा महिने या ना त्या कारणाने तो जेलची हवा खात असे. पॉलने १९ जणांची गळा घोटून हत्या केली आहे.
जेफरी डाहमर ऊर्फ मिलवाऊकी कॅनिबल
डाहमरवर १७ पुरुषांच्या हत्येचा आरोप आहे. पुरुषांना फुस लावून तो घरी न्यायचा आणि मग त्यांची हत्या करून शरीराचे अवयव खाण्याची त्याला विकृत सवय होती. या नराधमाच्या ताब्यातून पळालेल्या व्यक्तीने पोलिसांना सांगितल्यानंतर डाहमरचा खेळ संपला. शिक्षा भोगत असताना दुसर्या कै द्याने जेलमध्ये त्याला ठार मारले.