Shahrukh Gauri: काय सांगता? अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरूख गौरीवर चिडला? ‘तो’ VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:23 AM2023-04-05T10:23:54+5:302023-04-05T10:25:48+5:30
Shahrukh Khan-Gauri Khan: अंबानी कुटुंबाच्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. साहजिकच या सोहळ्याची बरीच चर्चा झाली. या सोहळ्यातील एक ना अनेक इनसाईड व्हिडीओ आता बाहेर येत आहेत आणि सध्या त्याचीही चर्चा आहे.
Shahrukh Khan-Gauri Khan: अंबानी कुटुंबाच्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. साहजिकच या सोहळ्याची बरीच चर्चा झाली. अगदी हॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यातील एक ना अनेक इनसाईड व्हिडीओ आता बाहेर येत आहेत आणि सध्या त्याचीही चर्चा आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ आहे शाहरूख खान व त्याची पत्नी गौरी खान यांचा. हा व्हिडीओ पाहून तरी गौरी व शाहरूखमध्ये काहीतरी बिनसल्याचं दिसतंय. नेमकं काय ते ठाऊक नाही. पण या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
होय, व्हिडीओत शाहरूख व गौरी दिसत आहेत. प्रियंका चोप्रा व रणवीर सिंग दाेघं स्टेजवर परफाॅर्म करताहेत आणि स्टेजसमोर अगदी पहिल्या रांगेत उभी असलेली गौरी तिचा परफाॅर्मन्स एन्जॉय करतेय. पण या व्हिडीओमागची जी काही स्टोरी सांगितली जातेय, ती हैराण करणारी आहे. व्हिडीओत शाहरूख गौरीवर जरा रागाने ओरडताना दिसतोय. तो मागून येऊन गौरीच्या खांद्यावर हात ठेवतो. गौरी मागे वळून बघते आणि शाहरूख तिच्यावर रागात डाफरताना दिसतो. गौरीही त्याला उत्तर देते. पण जणू तिला गोष्ट तिथेच संपवायची असल्याचं जाणवतं.
या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते, तिथे म्युझिकचा आवाज जास्त असल्याने तो ओरडून बोलतोय. तर, काहींना मात्र शाहरुखचं असं वागणं पटलेलं नाही. अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. आता नेमकं खरं काय, हे शाहरूख व गौरीलाच ठाऊक. पण सध्या हा व्हिडीओ जाम चर्चेत आहे.