Suhana Khan : व्हिडीओ शाहरूखच्या लेकीचा अन् ट्रोल झाली काजोलची लेक, जाणून घ्या काय आहे भानगड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 05:34 PM2023-01-16T17:34:48+5:302023-01-16T17:36:04+5:30
होय, सुहानाचा (Suhana Khan) व्हिडीओ समोर येताच, अनेकांनी काजोलची लेक न्यासा देवगणला ( Nysa Devgan) ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
शाहरूखची (Shahrukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan ) एक लोकप्रिय स्टार किड आहे. लवकरच सुहाना खानचा डेब्यू होतोय. साहजिकच या ना त्या कारणानं ती सतत चर्चेत असते. तूर्तास मात्र सुहानाचा एक नो मेकअप लुकमधील व्हिडीओ व्हायरल होतोय आणि तिचा हा व्हिडीओ समोर येताच ट्रोल होतेय ती न्यासा देवगण.
होय, सुहानाचा नो मेकअप लुकमधील व्हिडीओ समोर येताच, अनेकांनी काजोलची लेक न्यासा देवगणला ( Nysa Devgan) ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
व्हिडीओत सुहाना व गौरी खान दिसत आहेत. सुहाना गाडीमध्ये बसलेली दिसत असून आईची वाट बघत आहे. सुहाना गाडीत बसलेली बघून मीडियाचे कॅमेरे तिच्यावर रोखले जातात. मीडिया फोटोग्राफर्सकडे पाहून सुहाना स्मित हास्य करते.शिवाय फोटोग्राफर्स फोटो काढत आहेत हे कळताच स्वत:चं जॅकेटही नीट करते. व्हिडीओत सुहाना अगदी नो मेकअप लुकमध्ये दिसतेय.
तर याच व्हिडीओवर कमेंट्स करत अनेकांनी सुहानाचं कौतुक केलं आहे. तर न्यासाला ट्रोल केलं आहे. सुहाना मेकअप केल्यावर जितकी छान दिसते तितकीच छान ती विना मेकअपही दिसते, असं अनेकांनी म्हटलं आहे. काहीही असो, शाहरूखची लेक कायम डिसेंट दिसते. ना ड्रामा, ना अटेंशन सीकर... काजोलची लेकीसारखी ती अजिबात नाहीये, असं अन्य एका युजरने लिहिलं आहे. खरंच सुहाना खूप कूल आहे. बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या स्टारची मुलगी असूनही अन्य स्टार किड्स सारखा ॲटिट्यूड तिच्यात अजिबात नाहीये, असं एका युजरने लिहिलं आहे. ना प्लास्टिक सर्जरी, ना मेकअप तरीही ही सुंदर दिसते, अशा शब्दांत अनेकांनी सुहानाचं कौतुक केलं आहे.
का ट्रोल होते न्यासा देवगण...?
काजोल व अजय देवगणची लेक न्यासा देवगण तिच्या लुकमुळे सतत चर्चेत असते. न्यासाने प्लास्टिक सर्जरी केल्याचा दावा अनेक नेटकरी करतात. पार्ट्यांमधील तिचा बोल्ड लुकही चर्चेत असतो. यामुळेही ती अनेकदा ट्रोल होते.