'जब तक तुम्हारा बाप जिंदा है', शाहरुख खान पत्नी गौरी आणि मुलांना काय म्हणाला? व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:01 PM2024-03-12T12:01:13+5:302024-03-12T12:01:37+5:30
किंग खान शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. किंग खानच्या चित्रपटांसोबतच त्याची लाइफस्टाइल आणि त्याचे कौटुंबिक जीवन, या विषयांची त्याचे चाहते नेहमीच चर्चा करत असतात. त्यामुळेच फक्त शाहरुखच नव्हे तर त्याचं अख्खं कुटुंब नेहमी लाइमलाइटमध्ये आणि चर्चेत असतं. सोशल मीडियावर पुन्हा एकदा या खान कुटुंबाची चर्चा सुरू झाली. त्याचं कारण हे किंग खानचं ठरला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतेच शाहरुखने झी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. पुरस्कार मिळताच शाहरुखने त्याच्या कुटुंबीयांना स्टेजवरुन एक खास मेसेज दिला. तो म्हणाला, 'हा पुरस्कार मी माझा मुलगा आर्यन, सुहाना, अबराम आणि पत्नी गौरीला डेडिकेट करतो आहे. तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की, जब तक तुम्हारा बाप जिंदा है तब तक एंटरटेनमेंट जिंदा हैं'. यानंतर सोहळ्यात चाहत्यांनी एक जल्लोष केला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
शाहरुख खान हा उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. तसाच तो उत्तम पिता आणि पती देखील आहे. कामात किती ही व्यग्र असला तरी तो कुटुंबासाठी आवर्जून वेळ देतो. त्याच्या मुलांबरोबर अनेकदा क्वालिटी टाईम घालवत असतो. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर यावर्षी त्याचे 'पठाण, 'जवान' आणि 'डंकी' हे तिन्ही चित्रपट सुपरडुपर हिट ठरले. तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घातला.