"ती जगातली पहिली अशी पत्नी..." गौरीविषयी काय म्हणाला किंग खान? कठीण प्रसंगावरही केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:03 AM2024-09-30T10:03:50+5:302024-09-30T10:05:19+5:30

आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर भाषणात शाहरखने पत्नी गौरी खानचे आभार मानत एक मजेशीर स्टेटमेंट केलं. तसंच कठीण प्रसंगावरही बोलला.

Shah Rukh Khan speech after IIFA awards 2024 speaks about difficult times while making jawan thanks wife gauri khan | "ती जगातली पहिली अशी पत्नी..." गौरीविषयी काय म्हणाला किंग खान? कठीण प्रसंगावरही केलं भाष्य

"ती जगातली पहिली अशी पत्नी..." गौरीविषयी काय म्हणाला किंग खान? कठीण प्रसंगावरही केलं भाष्य

अबूधाबी येथे नुकताच आयफा पुरस्कार २०२४ (IIFA 2024) पुरस्कार सोहळा पार पडला. शाहरुख खानने (Shahrukh Khan) सोहळ्याचं होस्टिंग करत शान वाढवली. तसंच शाहरुखला यंदा 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कारही मिळाला. 'जवान' सिनेमासाठी त्याने हा पुरस्कार पटकावला. यानंतर त्याने स्टेजवर केलेलं भाषण व्हायरल होत आहे. भाषणात त्याने पत्नी गौरी खानचे आभार मानत एक मजेशीर स्टेटमेंट केलं. तसंच कठीण प्रसंगावरही बोलला.

शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर एकच जल्लोष झाला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यानंतर शाहरुखने दिलखुलास भाषणही केलं. तो म्हणतो, " खूप धन्यवाद. बाकी नॉमिनींचेही मी आभार मानतो. रणबीर, रणवीर, विक्रांत, सनी, विकी सगळ्यांनीच चांगलं काम केलं. मात्र मी बऱ्याच काळानंतर आल्याने मला प्रेक्षकांचं जास्त प्रेम मिळालं. कोणीतरी मला आठवण करुन दिली की सिनेमासाठी पैसे लावणं खूप गरजेचं आहे. यासाठी मी गौरीचे आभार मानतो. कदाचित ती जगातली पहिली अशी बायको असेल जी नवऱ्यावर इतके पैसे खर्च करत आहे. जवान बनवताना बऱ्याच कठीण प्रसंगातूनही जावं लागलं. पण आमची सहनशीलता, गांभीर्य हे सगळंच कामी आलं. सर्वांचे मनापासून आभार."

शाहरुख खानच्या भाषणातील कठीण प्रसंगाचा रोख हा आर्यन खान केसकडे असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. २०२१ मध्ये आर्यन खानला ड्रग्स केसप्रकरणी अटक झाली. एनसीबीने त्याची कसून चौकशी केली. त्याला काही काळ तुरुंगातही राहावं लागलं होतं. शाहरुख खानच्या कुटुंबासाठी तो काळ खूपच कठीण होता. 

Web Title: Shah Rukh Khan speech after IIFA awards 2024 speaks about difficult times while making jawan thanks wife gauri khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.