किंग खानच्या 'मन्नत'मध्ये बाप्पा विराजमान, शाहरुख खानने शेअर केला खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 07:58 PM2023-09-19T19:58:44+5:302023-09-19T20:00:47+5:30

किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे.

Shah Rukh Khan welcomes Ganpati Bappa home on Ganesh Chaturthi | किंग खानच्या 'मन्नत'मध्ये बाप्पा विराजमान, शाहरुख खानने शेअर केला खास फोटो

Shahrukh Khan

googlenewsNext

आज १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आहे. संपूर्ण आसमंत त्याच्या येण्याने दुमदुमून गेला आहे. अनेक सेलेब्रिटीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अशातच किंग खानच्या घरी म्हणजेच मन्नतमध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. शाहरुखने त्याच्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या घरी गणपतीचे आगमण झाल्याचे दिसत आहे.

शाहरुखने सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किंग खानने पोस्टमध्ये म्हटले की, 'गणपती बाप्पाचं घरी स्वागत केलं. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला श्री गणेशाच्या पूजनाच्या शुभेच्छा. भगवान गणेश आपल्या सर्वांना सुख, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक मिळो!!!". शाहरुख खान जवळजवळ दरवर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत करतो. शाहरुख प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो, मग ती ईद असो, दिवाळी असो की गणेश चतुर्थी.

शाहरुख खानची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, 'शाहरुख खान एकतेचे उदाहरण आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'सर्वात धर्मनिरपेक्ष अभिनेता'. तर काहींनी 'देशात बंधुभावाची शांती नांदू दे' अशी कमेंट केली. 

गेल्या दोन आठवड्यांपूर्वी किंग खानचा शाहरुखचा जवान हा प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला. पठाणनंतर शाहरुखचा हा दुसरा प्रोजेक्ट चाहत्यांच्या भेटीला आला आहे. याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यानं देखील हजार कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर जगभरातुन ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. शाहरुख खानच्या जवानने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय.

Web Title: Shah Rukh Khan welcomes Ganpati Bappa home on Ganesh Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.