किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 06:22 PM2024-07-02T18:22:25+5:302024-07-02T18:23:51+5:30
शाहरुख खानला प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित केले जाणार आहे (shahrukh khan)
शाहरुख खानने प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आज बॉलिवूमध्ये स्वतःचं नाव कमावलंय. शाहरुखच्या सिनेमांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करतात. इतकंच नव्हे विविध भूमिकांनी शाहरुखही लोकांचं प्रेम मिळवतो. शाहरुखला आजवर राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध सन्मान मिळाले आहेत. अशातच शाहरुखला आणखी एक सन्मान मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचा अभिमान वाटतोय.
शाहरुख खानचा जागतिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार सन्मान
जगात मानाचा समजला जाणार ७७ वा लोकार्नो चित्रपट महोत्सवा लवकरच पार पडणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडचा बादशाह आणि ग्लोबल स्टार बनलेल्या शाहरुख खानचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. अभिनेत्याला त्याच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल प्रतिष्ठित पारडो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो पुरस्काराने सन्मानित केले जाईल. भारतीय चित्रपटसृष्टीतील विविध शैलीतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये योगदान दिल्याबद्दल शाहरुखला महोत्सवात लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड किंवा लेपर्ड अवॉर्डने सन्मानित केले जाईल.
To welcome a living legend like #ShahRukhKhan in Locarno is a dream come true.
— Locarno Film Festival (@FilmFestLocarno) July 2, 2024
The actor and film producer – a true Indian superstar, a symbol of the vitality of Hindi-language cinema – will receive our career achievement award, the Pardo alla Carriera, at #Locarno77. pic.twitter.com/NGxbLbgxTS
या तारखेला मिळणार शाहरुखला बहुमान
हा चित्रपट महोत्सव ऑगस्टमध्ये होणार आहे. शाहरुख खानला शनिवारी १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात शाहरुख खानचा गाजलेला 'देवदास' चित्रपटही दाखवला जाणार आहे. यानंतर रविवारी ११ ऑगस्ट रोजी शाहरुख लोकांशी संवाद साधण्यासाठी त्याची खास उपस्थिती दर्शवणार आहे. हा महोत्सव १७ ऑगस्टपर्यंत चालणार असून ७ ऑगस्टला सुरू होणार आहे. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल स्वित्झर्लंडमध्ये संपन्न होतो.