'जवान' पाहून शाहरूख खानचा मुलगा अबरामने दिली ही रिअ‍ॅक्शन, अभिनेत्याने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 05:03 PM2023-09-23T17:03:57+5:302023-09-23T17:05:06+5:30

Jawan Movie : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा 'जवान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Shah Rukh Khan's son AbRam's reaction after watching 'Jawan', actor reveals | 'जवान' पाहून शाहरूख खानचा मुलगा अबरामने दिली ही रिअ‍ॅक्शन, अभिनेत्याने केला खुलासा

'जवान' पाहून शाहरूख खानचा मुलगा अबरामने दिली ही रिअ‍ॅक्शन, अभिनेत्याने केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या 'जवान'च्या यशाचा आनंद घेत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'जवान'ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर पकड कायम ठेवली आहे. लोकांना चित्रपट खूप आवडला आहे. चित्रपट समीक्षकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण चित्रपटाचे आणि कलाकारांचे कौतुक करत आहेत. दरम्यान आता शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान याचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. किंग खानने आपल्या मुलाला हा चित्रपट कसा आवडला हे सांगितले आहे.

शाहरुख खानने ट्विटरवर नुकतेच 'आस्क एसआरके' सत्र आयोजित केले होते, जिथे त्याने त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एका यूजरने त्याला विचारले की, 'त्याचा धाकटा मुलगा अबरामला त्याचा जवान हा चित्रपट कसा आवडला?' या प्रश्नावर किंग खानने मजेशीर उत्तर दिले आहे.

म्हणाला- बाप बाप असतो...
त्याने मस्करीत म्हटले की 'बाप बाप असतो..!! नाही नाही, मी फक्त गंमत करत आहे. त्याला मोठ्या माणसासोबतची लढाई आवडली. त्याला क्लायमॅक्स आवडला. अबरामला शाहरुखचा विजय सेतुपतीसोबतचा फाईट सीन आवडला होता.

जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन
जवानच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने १६ दिवसांत एकूण ५३२.९३ कोटींची कमाई केली आहे. तुम्हाला सांगतो की, 'जवान'ने रिलीजच्या अवघ्या १५ दिवसांत सनी देओलचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर २'ला मागे टाकले आहे. SACNILC च्या अहवालानुसार, १५ दिवसांत 'जवान'ची एकूण कमाई ५२६.७३ कोटी रुपये आहे. तर 'गदर २'चे आजीवन कलेक्शन एकूण ५२२ कोटी रुपये आहे.

Web Title: Shah Rukh Khan's son AbRam's reaction after watching 'Jawan', actor reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.