पैसे नाही, तर चित्रपट महत्वाचा, शाहरुखने फुकटात केलं 'या' चित्रपटांसाठी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 08:13 PM2023-09-22T20:13:31+5:302023-09-22T20:15:09+5:30

अभिनेता शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेले असले तरी त्याने काही चित्रपटांमध्ये मानधन न घेता काम केलंय.

Shah Rukh worked for 'these' films for free | पैसे नाही, तर चित्रपट महत्वाचा, शाहरुखने फुकटात केलं 'या' चित्रपटांसाठी काम

Shah Rukh

googlenewsNext

बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटांसाठी जास्त मानधन घेतात, असं तुम्ही ऐकलं असेल.  कलाकार घेत असलेलं कोट्यवधी रुपयांच्या मानधनाचे नुसते आकडे पाहून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ येते.  पण तुम्हाला माहिती आहे का, अभिनेता शाहरुख खाननेबॉलिवूडमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेले असले तरी त्याने काही चित्रपटांमध्ये मानधन न घेता काम केलंय.

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'भूतनाथ रिटर्न्स' चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान याने मानधन न घेता काम केलंय. तर अभिनेता आर माधनवच्या रॉकेट्रीत किंग खान शाहरुखनं एकही रुपयाचे मानधन न घेता भूमिका केली. आर. माधवनने एका प्रेस कॉ़न्फरन्समध्ये शाहरुखनं रॉकेट्रीसाठी कशाप्रकारे सहकार्य केलं याविषयी सांगितलं होतं.

शाहरुख जेव्हा त्याच्या झीरो चित्रपटाची शुटींग करत होता, तेव्हा माधवननं त्याला आपल्या या चित्रपटासाठी विचारणा केली होती. शाहरुखनं देखील त्यात सहभागी होण्यास संमती दर्शवली. रॉकेट्री हा चित्रपट इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि रॉकेट सायंटिस्ट म्हणून नांबी नारायणन यांच्यावर आधारित आहे. शिवाय, क्रेझी ४ चित्रपटातही काम करण्यासाठी त्याने एक रुपयाही घेतला नव्हता.  

मआलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात शाहरुख खानने 'वानरास्त्र' ही व्यक्तिरेखा साकारली होती. शाहरुखने काही मिनिटांच्या स्क्रीन स्पेससाठी १८ दिवस शूट केले. एवढी मेहनत करूनही शाहरुखने निर्माता करण जोहरकडून पैसेही घेतले नाहीत. करण जोहरने हा किस्सा एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. तसेच त्याने 'ए दिल है मुश्किल'मध्येही एक भुमिका साकारली होती. यासाठीही त्यानं एकही रुपया घेतला नव्हता. तर दुल्हा मिल गया चित्रपटासाठीही शाहरुखने काहीचं मानधन घेतलं नव्हतं. 

 

Web Title: Shah Rukh worked for 'these' films for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.