करिनासोबतच्या त्या MMS वर शाहीद कपूरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'मी बर्बाद...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 12:26 PM2023-07-09T12:26:57+5:302023-07-09T12:28:46+5:30

मला काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय.

Shahid Kapoor reacts to MMS with Kareena kapoor says he was devastated after that | करिनासोबतच्या त्या MMS वर शाहीद कपूरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'मी बर्बाद...'

करिनासोबतच्या त्या MMS वर शाहीद कपूरने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'मी बर्बाद...'

googlenewsNext

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करिना कपूर (Kareena Kapoor) दोघंही सर्वात चर्चेतल्या कपलपैकी एक होते. आता दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण एकेकाळी त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. तेव्हा त्यांचा एक लिपलॉक करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि दोघांना चांगलाच धक्का बसला होता. नुकतंच शाहीदने त्या एमएमएस (MMS) वर स्पष्टीकरण दिलं आहे. 

शाहिद कपूर नुकताच 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, 'मी त्यावेळी बर्बाद झालो होतो. मी तेव्हा फक्त २४ वर्षांचा होतो आणि मला असं वाटलं की माझ्या खासगी अधिकाराचा भंग होत आहे. मी काहीच करु शकत नव्हतो. मला काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय. अशा गोष्टी नक्कीच तुमच्या जीवनावर परिणाम करतात तेही इतक्या कमी वयात जेव्हा तुम्हाला तुमच्या भावनांविषयी माहित नसतं. लहान वयात मुलीला डेट करताना कसं राहायचं असतं हे तेव्हा कळत नाही आणि त्यातच अशा घटना होतात.'

शाहीद कपूर आणि करिना अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. लपूनछपून नाही तर अगदी खुलेआम ते एकमेकांवरील प्रेम व्यक्त करायचे. त्याचवेळी त्यांचा MMS लीक झाला होता. मात्र २००७ साली त्यांचं ब्रेकअप झालं.तरी नंतर त्यांनी 'जब वी मेट' आणि 'उडता पंजाब' सिनेमात काम केलं. 'जब वी मेट' तेव्हा सुपरहिट ठरला होता. 

आज करिना पतौडी घराण्याची सून आहे. तिने सैफ अली खानशी लग्न केले. त्यांना तैमुर आणि जेह ही दोन मुलं आहेत. तर शाहीद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केले. त्यांना मीशा आणि झेन ही दोन मुलं आहेत. दोघंही आज आपापल्या संसारात रमले आहेत.

Web Title: Shahid Kapoor reacts to MMS with Kareena kapoor says he was devastated after that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.