'मी म्हशीसोबतही रोमान्स करेन'; करीनाबरोबर काम करण्याविषयी विचारताच शाहिदने दिलं विचित्र उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 03:16 PM2022-07-22T15:16:46+5:302022-07-22T15:17:46+5:30

Shahid kapoor: एकेकाळी या दोघांच्या प्रेमकथा बऱ्याच चर्चिल्या होत्या. एकमेकांना डेट करणारी ही जोडी अचानकपणे विभक्त झाली.

shahid kapoor will work with ex girlfriend kareena kapoor know his answer | 'मी म्हशीसोबतही रोमान्स करेन'; करीनाबरोबर काम करण्याविषयी विचारताच शाहिदने दिलं विचित्र उत्तर

'मी म्हशीसोबतही रोमान्स करेन'; करीनाबरोबर काम करण्याविषयी विचारताच शाहिदने दिलं विचित्र उत्तर

googlenewsNext

कलाविश्वात बऱ्यापैकी चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करिना कपूर (Kareena Kapoor). एकेकाळी या दोघांच्या प्रेमकथा बऱ्याच चर्चिल्या होत्या. एकमेकांना डेट करणारी ही जोडी अचानकपणे विभक्त झाली. त्यानंतर दोघांनी स्वतंत्रपणे आपला जोडीदार निवडला. या ब्रेकअपनंतर ही जोडी पुन्हा कधीच एकत्र स्क्रीनवर दिसली नाही. परंतु, आजही त्यांची चर्चा होताना दिसते. यात शाहिदची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. यात पुन्हा एकदा करीनासोबत काम करण्याविषयी त्याने भाष्य केलं आहे.

'फिदा', 'चुपचुप के', 'जब वी मेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं आहे. मात्र, जब वी मेटच्या शुटिंगदरम्यान या दोघांचा ब्रेकअप झाला. याच काळात शाहिदने एका मुलाखतीत पुन्हा करीनासोबत काम करणार का? याविषयी त्याचं मत सांगितलं.

"मी एक अभिनेता आहे त्यामुळे निर्माते मला जे सांगतील ते मी करायला तयार आहे. निर्मात्यांनी मला गाय किंवा म्हशीसोबत रोमान्स करायला सांगितला तर तोदेखील मी करेन. एक अभिनेता म्हणून माझं ते काम आहे.",असं शाहिद म्हणाला.

दरम्यान, अलिकडेच शाहिदचा जर्सी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपट प्रदर्शनापूर्वी त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. मात्र, रिलीज झाल्यानंतर त्याची बॉक्स ऑफिसवर फारशी जादू चालली नाही. तर, करीना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: shahid kapoor will work with ex girlfriend kareena kapoor know his answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.