शाहरुख-काजोलच्या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, जाणून घ्या 'कभी खुशी कभी गम' विषयीच्या काही रंजक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 01:54 PM2023-12-14T13:54:39+5:302023-12-14T13:55:01+5:30
शाहरुखच्या बालपणीचा रोल हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानने केला होता. तर शुटींगच्या दरम्यान काजोलही प्रेग्नंट होती. पण..
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल, करीना कपूर खान, हृतिक रोशन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, फरीदा जलाल, करण जोहर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. इतके वर्ष उलटली तरीही या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 14 डिसेंबरला म्हणजेच आज 22वर्ष पूर्ण केली आहेत. नुकतेच करण जोहरने 'कभी खुशी कभी गम'ला 22 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
'कभी खुशी कभी गम'मध्ये शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंतच्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने तर जिंकलीच, पण या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरल्या. राहुलची गोंडस शैली असो, किंवा अंजलीची विनोदी बडबड किंवा करीना कपूरची 'पू' ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेम, ड्रामा आणि इमोशन्सचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या सिनेमाच्या काही रंजक गोष्टी आपण जाणून घेऊयात.
शाहरुख खानने या सिनेमात राहूल हे पात्र साकारलं होतं. छोट्या राहूलची म्हणजेच शाहरुखच्या बालपणीचा रोल हा शाहरुखचा मुलगा आर्यन खानने केला होता. शिवाय, ‘कह दो ना, कह दो ना, यु आर माझी सोनिया’ या गाण्यात शाहरुख आणि काजोलची जोडी असणार होती. पण, नंतर हे गाणं हृतिक आणि करिनावर चित्रित झाले.
सिनेमाली गाणी आजही आवडीने प्रेक्षक ऐकतात. 'कभी खुशी गम' मधील 'शावा शावा' हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी 16 दिवस लागले होते. शिवाय, या चित्रपटात अमिताभ आणि जया बच्चन हे रिअल लाइफ कपल 20 वर्षांनंतर रील लाईफमध्ये एकत्र दिसले होते. याआधी हे दोघेही 1981 मध्ये आलेल्या सिलसिला चित्रपटात एकत्र दिसले होते.
तर चित्रपटाच्या शुटिंगपुर्वी नुकतेच काजोलचे अजय देवगनसोबत लग्न झाले होते. कोजोलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सिनेमाच्या सेटवर प्रचंड तणावाचं वातावरण असायचं. शुटींगच्या वेळी मी प्रेग्नंट होती आणि त्याच दरम्यान माझ मिसकॅरेज झालं होतं. तर ‘बोले चुडिया’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान करण जोहरही डिहायड्रेशनमुळे सेटवरच बेशुद्ध पडला होता.