आधी 'पठाण', मग 'जवान' आणि आता... पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार किंग खानचा डॅशिंग अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:41 PM2023-09-15T17:41:37+5:302023-09-15T17:45:06+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख साठी हे वर्ष खूप खास आहे. शाहरुखचे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरले

Shahrukh khan action avtaar new video viral after jawan and pathaan success says maza to ab aayega | आधी 'पठाण', मग 'जवान' आणि आता... पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार किंग खानचा डॅशिंग अंदाज

आधी 'पठाण', मग 'जवान' आणि आता... पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार किंग खानचा डॅशिंग अंदाज

googlenewsNext

Shahrukh Khan:बॉलिवूडचा किंग खान शाहरुख साठी हे वर्ष खूप खास आहे. शाहरुखचे सलग दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरले. 'पठान'ने जगभरात एक हजार कोटींची कमाई केली, तर 'जवान'ने 'पठान'चा रेकॉर्ड मोडला आहे.    शाहरुखने पुन्हा एकदा तोच बॉलिवूडचा किंग असल्याचे सिद्ध केले आहे. लोक त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. पठान आणि जवाननंतर शाहरुख खान पुन्हा एकदा अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. शाहरुख खानच्या फॅन्स पेजवरुन एका व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो व्हायरल होतोय.    

शाहरुख खानचा सस्पेन्सने भरलेले एका व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये १६ सप्टेंबरला मोठी घोषणा होणार असं लिहिण्यात आलं आहे. आता ही नक्की नवी घोषणा काय होणार याबाबत कोणालाच कल्पना नाही. काही लोक म्हणतायेत की  हा नव्या सिनेमाचा टीझर आहे तर काहींचं म्हणणं आहे ही नवी जाहिरात आहे.   

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कुणी लिहिले, खूप मजा आली तर कुणी लिहिले, ही जाहिरात वाटतेय..

शाहरुख खानच्या जवानबाबत बोलायचे झाल तर या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. जवानने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींची कमाई केली आहे. तर देशातील बॉक्स ऑफिसवर ३८९.८८ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. लवकरच हा सिनेमा ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. 


 

Web Title: Shahrukh khan action avtaar new video viral after jawan and pathaan success says maza to ab aayega

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.