SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 11:12 AM2024-04-30T11:12:18+5:302024-04-30T11:12:56+5:30
स्टेडियममध्ये बसून शाहरुख आणि अबरामचे कँडिड क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) KKR संघाचा मालक आहे. आयपीएलमध्ये KKR च्या सामन्यादरम्यान तो आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जुन येतो. शाहरुखसोबत त्याचा छोटा मुलगा अबरामही (Abram Khan) मॅच पाहायला येतो. अबरामने त्याच्या क्युटनेसमुळे सर्वांनाच प्रेमात पाडलंय. काही दिवसांपूर्वीच त्याचा खेळाडू रिंकू सिंगसोबत बॉलिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता अबराम आणि शाहरुखचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये बापलेक मस्ती करताना दिसत आहेत.
स्टेडियममध्ये बसून शाहरुख आणि अबरामचे कँडिड क्षण प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. एक व्हिडिओ क्लिप सध्या ट्विटरवरुन व्हायरल होत आहे. यामध्ये शाहरुख गंमतीत अबरामला पकडतो. तर अबराम शाहरुखचा हात बाजूला करत 'आऊट हो जाएगा आऊट हो जाएगा' असं बोलताना दिसतोय. अबराम मॅच संदर्भातच चर्चा करताना दिसतोय. अगदी सहावी सातवीतल्या या मुलाचा उत्साहही जास्त आहे. व्हाईट शर्टमध्ये अबराम खूपच क्युट दिसत आहे. बापलेकाची मस्ती कॅमेऱ्यात कॅप्चर झाली आहे.
A heartwarming father-son moment between Shah Rukh Khan & AbRam during the KKR vs DC match! 💜💛@iamsrk@KKRiders@KKRUniverse#ShahRukhKhan#SRK#AbRam#KKR#KKRvsDCpic.twitter.com/mztfkLxBdm
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) April 29, 2024
यानंतर शाहरुख अबरामसोबत संपूर्ण स्टेडियम फिरला. प्रेक्षकांना त्याने अभिवादन केलं. तसंच त्याची सिग्नेचर पोजही करुन दाखवली.
The Happy King Khan takes The Victory Lap at Eden Gardens 💜 🔥#ShahRukhKhan#KKRvsDCpic.twitter.com/AXHqeYFJwb
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) April 29, 2024
सरोगसीच्या माध्यमातून मे २०१३ साली अबरामचा जन्म झाला. तो ११ वर्षांचा आहे. अबरामला आर्यन आणि सुहाना हे बहिण भाऊ आहेत. सगळ्यांचाच अबरामवर जीव आहे. अनेकदा आईसोबत अबराम पापाराझींसमोर पोज देतो. त्याच्या साधेपणाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.