"याला म्हणतात ब्युटी", शाहरुखची लेक सुहाना खानने वेधले लक्ष, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:57 PM2020-12-21T18:57:18+5:302020-12-21T19:03:43+5:30
सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. 2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूट नंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या.
आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलिवूड एंट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत. इंडस्ट्रीत लोकप्रिय स्टारकिडसपैकी एक सुहाना आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोमध्ये फॉलोअर्स असून नेटीझन्स तिच्या प्रत्येक लूकला पसंती देत कमेंटस लाईक्स करत असतात. सुहानाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंवर नेटीझन्स पसंती देत आहेत.
युजर्स तिचे फोटो पाहून तिच्यावर फुल ऑन फिदा होत आहेत. .एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करत ''याला म्हणतात ब्यूटी'' असे म्हटले आहे तर एकाने म्हटले आहे की, ''स्ट्रॉन्ग एंड ब्यूटीफुल'', ''यू आर स्टनिंग एंड गॉर्जियस'' अशा कमेंटसचा वर्षाव सुहानाच्या फोटोंवर होत आहे. आपली फॅशन, स्टाईल याबाबत सुहाना बरीच सजग असते. कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची सुहाना विशेष खबरदारी घेते.
सुहाना खान बॉलिवूड डेब्यू करणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. 2018 मध्ये तिने वोग मॅगझिनसाठी कव्हर फोटोशूट केले होते. या फोटोशूट नंतर सुहानाच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शाहरुखने या बातम्या धुडकावून लावल्या होत्या.
शाहरूखची 19 वर्षांची लेक सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकत होती.सुहानाही कोरोनाच्या धास्तीमुळे घरात कोंडून घ्यावे लागले होते.कुटुंबापासून दूर असलेल्या सुहानाला आपल्या कुटुंबियांची आठवण येत होती त्यामुळे भावूक झालेल्या सुहानाच्या डोळ्यात पहिल्यांदाच अश्रू आल्याचे पाहायला मिळाले होते.
मध्यंतरी संजय लीला भन्साळी सुहानाला लॉन्च करणार, अशी बातमी होती. कुण्या बड्या दिग्दर्शकाने सुहानाला लॉन्च करावे, ही शाहरूखची इ्च्छा होती. शाहरूखला काहीतरी भव्य हवे होते.
आता भव्यदिव्य असे काही हवे असेल तर भन्साळींसारख्या लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शकाशिवाय बॉलिवूडमध्ये अन्य दुसरा पर्याय नाही. कारण भन्साळी त्यांच्या भव्यदिव्य सिनेमांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सुहानाच्या लॉन्चिंगसाठी शाहरूखने भन्साळींच्या नावाला पसंती दिली, असे म्हटले गेले होते.