"बेटे को हाथ लगाने से पहले..." शाहरुखचा डायलॉग स्क्रीप्टमध्ये नव्हताच; लेखक म्हणाले, 'तो सीन...'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:20 PM2023-09-14T13:20:24+5:302023-09-14T13:29:37+5:30
शाहरुखचा हा डायलॉग सध्या सर्वच चाहत्यांच्या तोंडावर आहे.
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) रिलीज होताच चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. 'पठाण' नंतर जवाननेही शाहरुखला पुन्हा किंग असल्याचं सिद्ध केलंय. साऊथ दिग्दर्शक अॅटलीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून शाहरुख खान जबरदस्त अॅक्शन अंदाजात दिसत आहे. याशिवाय त्याचा एक डायलॉगही गाजतोय ज्यामुळे चाहत्यांना समीर वानखेडेच आठवलेत.
'बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर'
शाहरुखचा हा डायलॉग सध्या सर्वच चाहत्यांच्या तोंडावर आहे. या डायलॉगने त्यांना समीर वानखेडेच आठवलेत. समीर वानखेडेंनी आर्यन खानला कॉर्डेलिया क्रुझप्रकरणी अटक केली होती. याबदल्यात शाहरुखकडे खंडणीही मागितली. तो काळ शाहरुखच्या कुटुंबासाठी खूपच टेन्शनचा होता. आता शाहरुखने या डायलॉगमधून समीर वानखेडेंनाच इशारा दिलाय का अशी चर्चा सुरु आहे.
हा डायलॉग आधी नव्हताच?
शाहरुखचा हा डायलॉग लिहीणारे लेखक सुमित अरोरा म्हणतात,"हा डायलॉग खरंतर शूटिंगच्या दिवशीच घेण्यात आला. यामागच्या गोष्टीमुळे तुम्ही फिल्ममेकिंगच्या जादूवर विश्वास कराल.हा डायलॉग खरंतर ओरिजनलल स्क्रिप्टमध्ये नव्हताच. जेव्हा शाहरुख हा डायलॉग बोलतो तेव्हा असं वाटतं की हे लिहिलेलंच होतं. पण आम्हाला माहितीये की तो क्षण कोणत्याही डायलॉगशिवायही खूप पॉवरफुल होता. मात्र प्रत्यक्ष शूटिंग करताना असं वाटलं की काहीतरी लाइन पाहिजे, हा माणूस काहीतरी बोलला पाहिजे."
ते पुढे म्हणाले,"त्या दिवशी मी सेटवरच होतो. मला बोलावण्यात आलं. तो सीन पाहून आपसूकच माझ्या तोंडातून निघालं - बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर' तेव्हा असं वाटलं की ही लाइन त्या सीनसाठी अगदी योग्य आहे. अॅटली आणि शाहरुख दोघांनाही हे पटलं आणि सीन शूट झाला."