शाहरुखच्या जवानच्या दिग्दर्शकाचा नादखुळा! कोट्यवधींच्या संपत्तीचा आहे मालक, एका चित्रपटासाठी घेतो 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 04:27 PM2023-09-07T16:27:39+5:302023-09-07T16:37:48+5:30

अ‍ॅटली हा साऊथमधील मोस्ट डिमाडिंग आणि महागड्या दिग्दर्शकांपैकी आहे.

Shahrukh khan jawan director atlee kumar net worth salary income details | शाहरुखच्या जवानच्या दिग्दर्शकाचा नादखुळा! कोट्यवधींच्या संपत्तीचा आहे मालक, एका चित्रपटासाठी घेतो 'इतके' कोटी

शाहरुखच्या जवानच्या दिग्दर्शकाचा नादखुळा! कोट्यवधींच्या संपत्तीचा आहे मालक, एका चित्रपटासाठी घेतो 'इतके' कोटी

googlenewsNext

किंग खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा 'जवान' (Jawan)आज रिलीज झाला. चाहत्यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बघत थिएटरबाहेर जल्लोष केला. शाहरुखची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 'जवान' ची क्रेझ दुबईच्या बुर्ज खलिफापर्यंत पोहोचली. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या ‘जवान’ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘जवान’मधील शाहरुखचे लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. अनेक कारणांबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे प्रसिद्ध  दिग्दर्शक अ‍ॅटलीने केलं आहे. अ‍ॅटली हा साऊथमधील मोस्ट डिमाडिंग दिग्दर्शकांपैकी आहे. अ‍ॅटली आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधींची फिस घेतो. 

'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीचे खरे नाव अरुण कुमार आहे. त्याने 2013 साली राजा राणी या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अ‍ॅटली दिग्दर्शित बिगिल हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाने २०० कोटींहुन अधिक कमाई केली होती. अ‍ॅटलीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलत असताना, Siasat.com च्या रिपोर्टनुसार, 'जवान'च्या दिग्दर्शकाकडे एकूण संपत्ती 42 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

रिपोर्टनुसार, अ‍ॅटली  प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास 52 कोटी रुपये फी घेतो. मात्र त्याने जवानसाठी मानधन कमी करत फक्त 30 कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे. 

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात दीपिका पादुकोण पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. जवानमध्ये शाहरुखबरोबर इतर सहा अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यातीलच एका भूमिकेत गिरीजा ओक दिसणार आहे.

Web Title: Shahrukh khan jawan director atlee kumar net worth salary income details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.