"तो मला मुलासारखाच", शाहरुख खानची रिषभ पंतवर प्रतिक्रिया; म्हणाला, 'त्याचा अपघात...'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:50 PM2024-04-30T15:50:47+5:302024-04-30T15:53:42+5:30
IPL 2024 च्या सामन्यांदरम्यान अनेक घडामोडी घडत असतात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट राइडर्स असा सामना काल झाला. यामध्ये ...
IPL 2024 च्या सामन्यांदरम्यान अनेक घडामोडी घडत असतात. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट राइडर्स असा सामना काल झाला. यामध्ये कोलकताने दिल्ली कॅपिटल्सला 7 विकेटने हरवले. मॅचनंतर शाहरुख खानने (Shahrukh Khan) स्टार स्पोर्ट्सशी बातचीत केली. तेव्हा तो रिषभ पंत (Rishabh Pant) मला मुलासारखा आहे असं म्हणाला. डिसेंबर २०२२ मध्ये जेव्हा त्याचा अपघात झाला तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो असंही किंग खान म्हणाला.
शाहरुख खान म्हणाला,"तो खूपच भयानक अपघात होता. मी व्हिडिओ पाहिला होता. काय होणार हे आपल्याला तेव्हा माहित नसतं कारण असं काही झालं की आपल्या मनात वाईट विचार येतात. त्याच्या वयाची मुलं म्हणजे माझ्या मुलासारखीच आहेत. जेव्हा एखाद्या खेळाडूला दुखापत होते तेव्हा सर्वात जास्त वाईट वाटतं."
तो पुढे म्हणाला, "रिषभ पंत एक चॅम्पियन आहे. मी त्याला शुभेच्छा देतो. त्याचा गुडघा पूर्णपणे ठीक होईल अशी मला आशा आहे. पहिल्या मॅचच्या वेळीही मी त्याला भेटलो तेव्हा म्हणालो की अरे तू उठू नको कारण मला वाटलं त्याला त्रास होत असेल. मी त्याला विचारलं तू ठीक आहेस ना आता? कारण मी त्याला अपघातानंतर पाहिलंच नव्हतं. तो परत आलाय आणि चांगलं खेळतोय हे पाहून मला आनंदही झाला."