शाहरुख खानने ज्या चित्रपटाला दिला होता नकार, त्याने केली होती ३ हजार कोटींची कमाई, जिंकले होते ८ ऑस्कर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:02 AM2023-10-23T00:02:27+5:302023-10-23T00:02:42+5:30

Shahrukh Khan:

Shahrukh Khan's film which he refused, earned 3000 crores, won 8 Oscars | शाहरुख खानने ज्या चित्रपटाला दिला होता नकार, त्याने केली होती ३ हजार कोटींची कमाई, जिंकले होते ८ ऑस्कर  

शाहरुख खानने ज्या चित्रपटाला दिला होता नकार, त्याने केली होती ३ हजार कोटींची कमाई, जिंकले होते ८ ऑस्कर  

चित्रपटांच्या निर्मितीच्या कथाही तेवढ्याच सुरस असतात. एखादा चित्रपटसुद्धा एखाद्याच्या नशिबात लिहिलेला असतो. त्यामुळेच एखाद्या कलाकाराने सोडलेला एखादा चित्रपट हा दुसऱ्या कलाकाराचं नशीब उजळवून टाकतो. तर कधी कधी एखाद्या कलाकाराच्या हातून असा चित्रपट निसटतो जो पुढे इतिहास रचतो. बॉलिवूडमधील किंग खान अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. तसेच त्याला शेकडो पुरस्कारही मिळालेले आहेत. मात्र असा एक चित्रपट आहे ज्याला नकार देण्याचा शाहरुख खानला आजही खेद वाटत असेल. हो, असा एक चित्रपट आहे ज्याला शाहरुख खाननं नकार दिला होता. मात्र या चित्रपटाने पुढे इतिहास रचला. या चित्रपटाने हजारो कोटींची कमाई केलीच, सोबतच ऑस्कर पुरस्कारांमध्येही बाजी मारली.

या चित्रपटाचं नाव आहे स्लमडॉग मिलेनियर. डॅनी बॉएल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा तोच चित्रपट आहे ज्यामध्ये काम करण्यास शाहरुख खाननं नकार दिला होता. पुढे याच चित्रपटाने आठ अकादमी पुरस्कार म्हणजे ऑस्कर जिंकले. शाहरुख खानने या चित्रपटामध्ये काम करावं, अशी डॅनी बोएल यांची इच्छा होती. त्यांनी शाहरुखला प्रेम कुमार या पात्राची भूमिका ऑफर केली होती. शाहरुख खान सुरुवातीला या चित्रपटात काम करण्यास इच्छुक होता. मात्र नंतर त्याने नकार दिला. त्याला प्रेम कुमार हे पात्र आवडलं नव्हतं. 

शाहरुख खानने आधी कौन बनेगा करोडपती या शोमध्ये काम केलं होतं. स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटात या शोचं खास स्थान होतं. त्यामुळे शाहरुखने ती भूमिका करावी, असं डॅनी बोएल यांना वाटत होतं. प्रेम कुमार या पात्राला काही निगेटिव्ह शेड्स होते. त्यामुळे शाहरुखने ही भूमिका नाकारली. अखेर ही भूमिका अनिल कपूरने केली. २००९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट झाला. त्याने कोट्यवधीची कमाई केली. सोबतच ऑस्कर पुरस्कारही जिंकले. 

Web Title: Shahrukh Khan's film which he refused, earned 3000 crores, won 8 Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.