Hotness Alert! शमा सिकंदरने शेअर केला असा फोटो, फॅन्स म्हणाले - हॉट शब्दही कमी पडेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:09 IST2021-11-12T14:08:43+5:302021-11-12T14:09:47+5:30
शमा सिकंदर (Shama Sikander) ने इन्स्टाग्रामवर आपला हा फोटो शेअर केला आहे. फोटोत बघू शकता की, शमा सिकंदर सोफ्यावर बसलेली दिसत आहे.

Hotness Alert! शमा सिकंदरने शेअर केला असा फोटो, फॅन्स म्हणाले - हॉट शब्दही कमी पडेल...
अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहते. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आताही शमाने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिच्या फॅन्सच्या हृदयांचे ठोके नक्कीच वाढतील. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून फॅन्स कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
ब्लॅक बिकिनीमध्ये बोल्ड पोज
शमा सिकंदर (Shama Sikander) ने इन्स्टाग्रामवर आपला हा फोटो शेअर केला आहे. फोटोत बघू शकता की, शमा सिकंदर सोफ्यावर बसलेली दिसत आहे. तिने ब्लॅक कलरची बिकीनी घातली आहे. जी तिचा लूक फार बोल्ड बनवत आहे. तिने केस मोकळे सोडले आहेत आणि खिडकीतून बाहेर बघत आहे.
शमाच्या या फोटोचं भरभरून कौतुक होत आहे. एका यूजरने लिहिलं की, 'ब्यूटी क्वीन'. दुसऱ्या फॅनने कमेंट केली आहे की, 'तू फारच हॉट दिसत आहे. तर फॅन्स शमाच्या सौंदर्याचंही कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं की, 'हॉट शब्द तुझ्यासाठी कमी ठरेल'. या फोटोला एका तासात ६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
शमाला २००३ साली आलेल्या 'ये मेरी लाइफ है' या मालिकेतून ओळख मिळाली होती. यात तिने पूजा मेहताची भूमिका साकारली होती. जी नेहमीच सलवार-सूटमध्ये राहत होती. आता तिच्या लूकमध्ये खूप बदल दिसून आला आहे. असंही बोललं जातं की, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे. पण शमाने हे नाकारलं आहे.