ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ शम्मी आन्टी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 04:18 AM2018-03-06T04:18:58+5:302018-03-06T10:25:08+5:30

बॉलिवूडच्या लाडक्या ‘शम्मी आन्टी’ अर्थात अभिनेत्री शम्मी यांचे आज निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी tweet ...

Shammi aka Shammi Anty passed away | ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ शम्मी आन्टी यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी उर्फ शम्मी आन्टी यांचे निधन

googlenewsNext
लिवूडच्या लाडक्या ‘शम्मी आन्टी’ अर्थात अभिनेत्री शम्मी यांचे आज निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी tweet करून त्यांच्या निधनाची बातमी दिली. बच्चन कुटुंबाशी शम्मी आन्टींचे खास नाते राहिले आहे. शम्मी दीर्घकाळापासून आजारी होत्या. सोमवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शम्मी यांचे खरे नाव नर्गिस रबाडी होते. २४ एप्रिल १९२९ रोजी गुजरातच्या नारगोल संजान येथे त्यांचा जन्म झाला. पारसी कुटुंबात जन्मलेल्या नर्गिस या काही महिन्यांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले.नर्गिस यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी दूर दूरपर्यंत संबंध नव्हता. नर्गिस या अगदी योगायोगाने चित्रपटसृष्टीत आल्या. त्यांचा एक कौटुंबिक मित्र चिन्नू मामा दिग्दर्शक मेहबूब खानसोबत काम करत होता. चिन्नू मामाची अभिनेते व निर्माते शेख मुख्तार यांच्यासोबत घनिष्ठ मैत्री होती. शेख मुख्तार यांना त्यांच्या एका चित्रपटासाठी सहअभिनेत्री हवी होती. चिन्नू मामाने यासाठी नर्गिसला विचारले आणि इच्छा असेल तर शेख मुख्तार यांना भेटण्यास सांगितले. चित्रपट म्हणजे काय, हे फारसे ठाऊक नसूनही नर्गिस  मुख्तार यांना भेटायला गेल्या. या पहिल्या भेटीत नर्गिसच्या हिंदीबद्दल मुख्तार यांना जरा संशय होता. कारण त्या पारशी होत्या. नर्गिसच्या हे लगेच लक्षात आले आणि माझ्या हिंदीबद्दल तुमच्या मनात जराही शंका उरणार नाही, असे तिने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले. हा आत्मविश्वास पाहून मुख्तार यांनी नर्गिस  यांना दुस-या दिवशी स्क्रिन टेस्टसाठी बोलवले. दिग्दर्शक तारा हरीश यांनी नर्गिसला नर्गिस हे नाव बदलून शम्मी हे नवे नाव धारण करण्याचा सल्ला दिला. कारण नर्गिस नावाची एक अभिनेत्री आधीच चित्रपटसृष्टीत होती. नर्गिसने हा सल्ला ऐकला आणि नर्गिगची शम्मी झाली.



वयाच्या १८ व्या वर्षी शम्मी यांनी ‘उस्ताद पेड्रो’ हा पहिला चित्रपट साईन केला. यात त्यांनी सहनायिकेची भूमिका साकारली. पुढे‘मल्हार’ या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिकेची भूमिकासाकारली.  आपल्या सिनेकारकिर्दीत शम्मी यांनी दोनशेवर चित्रपट केलेत. चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही त्या दिसल्या. ‘देख भाई देख’ या मालिकेतील त्यांची भूमिका कुणीच विसरू शकत नाही. ‘जबान संभाल के’, ‘फिल्मी चक्की; या टीव्ही शोमध्येही त्या दिसल्या. 
शम्मी यांनी नर्गिस, मधुबाला, दिलीप कुमार यांच्या सारख्या दिग्गजांसोबत काम केले. 

Web Title: Shammi aka Shammi Anty passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.