'शांतीत क्रांती 2' मुळे ललितने स्वीकारलं होतं 'हे' आव्हान; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 02:24 PM2023-10-09T14:24:12+5:302023-10-09T14:25:39+5:30

Lalit prabhakar: या सीरिजमध्ये ललित प्रभाकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

Shantit kranti lalit prabhakar accepted challenge Shanti Kranti 2 | 'शांतीत क्रांती 2' मुळे ललितने स्वीकारलं होतं 'हे' आव्हान; म्हणाला...

'शांतीत क्रांती 2' मुळे ललितने स्वीकारलं होतं 'हे' आव्हान; म्हणाला...

googlenewsNext

 मराठी ओरिजिनल सिरीज 'शांतीत क्रांती'ला मिळालेल्या अपाय यशानंतर या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कधी प्रेक्षकांना हसवणारी, कधी आपलीशी वाटणारी तर कधी प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना एका नवा प्रवास पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यावेळी या सीरिजमध्ये मराठी कलाविश्वातील काही दिग्गज कलाकार झळकणार असून अलिकडेच अभिनेता ललित प्रभाकर याने या सीरिजमध्ये काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

 ''या सीझनच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच बस चालवण्याचा अनुभव घेतला. बस चालवण्यासोबतच मला डायलॉग्स बोलायचे होते, माझा सीन सादर करायचा होता. त्यामुळे हे एक आव्हानच होतं. या गुंतागुंतीमध्ये भरीस भर म्हणजे आम्हाला हा सीन गजबजलेल्या रस्त्यावर शूट करायचा होता.हे खरंच खूप आव्हानात्मक होतं. हा सीन करत असताना अनेक अडथळे आले. पण, आमचे दिग्दर्शक व सगळ्या टीमने माझ्यावर विश्वास ठेवला. तसंच सुरक्षेची पूर्णपणे खात्री घेतली, असं ललित म्हणाला.

'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

पुढे तो म्हणतो, हा सगळा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता जो कायम माझ्या स्मरणात राहिल.

दरम्यान, भडीपासोबत सहयोगाने टीव्‍हीएफद्वारे निर्मित आणि अरूनभ कुमार यांची निर्मिती असलेली सिरीज 'शांतीत क्रांती २'चे दिग्‍दर्शक सारंग साठये व पॉला मॅकग्लिन आहेत. या सिरीजमध्‍ये अभय महाजन, अलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी व प्रियदर्शिनी इंदलकर प्रमुख भूमिकेत आहेत.  ही सीरिज येत्या १३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Shantit kranti lalit prabhakar accepted challenge Shanti Kranti 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.