प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 09:25 AM2024-11-06T09:25:05+5:302024-11-06T09:28:12+5:30

बिहारच्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. 

sharda sinha famous chhath singer of bihar passes away at the age of 72 in delhi  | प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा काळाच्या पडद्याआड; वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

Sharda Sinha Passes Away : बिहारच्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा (Sharda Sinha )यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान काल मंगळवारी त्यांचं निधन झालं. 

शारदा सिन्हा यांचा मुलगा अंशुमन सिन्हा यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. सोशल मीडियावर शारदा सिन्हा यांचा फोटो शेअर करत मुलगा अंशुमन यांनी लिहिलंय, “तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना आणि प्रेम माझ्या आईसोबत कायम राहतील. परमेश्वराने आईला स्वतःकडे बोलावलं आहे. आता ती आपल्यासोबत राहिली नाही”, असं अंशुमन सिन्हा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली हळहळ 

शारदा सिन्हा यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर शारदा सिन्हा यांच्यासोबतच फोटो पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी लिहिलंय, "सुप्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांच्या निधनाने खूप दु:ख झालं. त्यांनी गायलेली  मैथिली आणि भोजपुरी लोकगीते लोकप्रिय आहेत. त्यांच्या जाण्याने संगीत जगतात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे". 

शारदा सिन्हा यांनी भोजपुरी आणि मैथिली भाषेत अनेक लोकगीते गायली. बॉलीवूडमध्ये त्यांनी सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटातील एका गाण्यालाही आपला आवाज दिला आहे. त्यांना १९९१ मध्ये 'पद्मश्री' आणि २०१८ मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Web Title: sharda sinha famous chhath singer of bihar passes away at the age of 72 in delhi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.