बॉलिवूड गाजवलं; आता OTT लाही करणार 'खामोश', 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा वेबसीरिजमधून लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:41 PM2024-03-08T13:41:15+5:302024-03-08T13:42:53+5:30

ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Shatrughan Sinha To Make Make His Debut In The World Of Ott With Web Series Gangs Of Ghaziabad | बॉलिवूड गाजवलं; आता OTT लाही करणार 'खामोश', 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा वेबसीरिजमधून लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला!

'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा वेबसीरिजमधून लवरकच प्रेक्षकांच्या भेटीला!

मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्यांमध्ये शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचा समावेश होतो. बॉलिवूडमध्ये शॉटगन म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मनोरंजन क्षेत्रात कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा कोणताही गॉड फादर नसताना  दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. एक नायक ते खलनायकापर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत स्वतःला सिद्ध करणारे शत्रुघ्न सिन्हा राजकारणात देखील यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ते मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्याचं दिसून आलं. आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा अभिनयाच्या दुनियेत पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा ओटीटीवर पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. ते 'गँग्स ऑफ गाझियाबाद' या वेब शोद्वारे वेब सीरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या कोऱ्या सीरिजमध्ये शत्रुघ्न सिन्हा व्यतिरिक्त आशुतोष राणा, प्रदीप नागर, जतिन सरना, अभिमन्यू सिंग, मुकेश तिवारी, माहिरा शर्मा आणि सनी लिओन यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहेत.

या सीरिजची निर्मिती विनय कुमार आणि प्रदीप नागर यांच्या सुमन टॉकीजच्या बॅनरखाली करण्यात येत आहे.  शत्रुघ्न सिन्हा हे 1970 आणि 1980 च्या दशकात रिलीज झालेल्या 'मेरे अपने', 'कालीचरण', 'विश्वनाथ', 'काला पत्थर' आणि 'दोस्ताना' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखले जातात. शत्रुघ्न सिन्हा शेवटचा 2018 मध्ये 'यमला पगला दीवाना: फिर से' मध्ये दिसले होते.

शत्रुघ्न सिन्हा अभिनयासह राजकारणातही प्रसिद्ध आहेत. त्यांची कारकिर्दीत भारतीय जनता पक्षात सुरु झाली ( Shartughan Sinha Political Journey ) . त्यांनी 1991 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. यासह ते राज्यसभेचे सदस्य आणि केंद्रात मंत्री राहिले. त्यानंतर 2019 मध्ये, त्यांच्या जागी भाजपने रविशंकर प्रसाद यांना पाटणा साहिबमधून उमेदवारी दिल्याने नाराज होत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांचा काँग्रेसमधील प्रवासही केवळ तीन वर्षांचा राहिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि टीएमसीमध्ये प्रवेश केला.
 

Web Title: Shatrughan Sinha To Make Make His Debut In The World Of Ott With Web Series Gangs Of Ghaziabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.