शेरलॉक अँड माय होम : आत्ममनाचा शोध

By Admin | Published: August 26, 2015 05:02 AM2015-08-26T05:02:13+5:302015-08-26T05:02:13+5:30

प्रत्येकच व्यक्तीचे स्वत:चे असे वेगळे विश्व असते आणि प्रत्येकालाच त्यात रमायला आवडते. पण एखादा क्षण असा येतो, की स्वत: बनवलेल्या विश्वाला तडा जातो

Sherlock and My Home: Self-Detection | शेरलॉक अँड माय होम : आत्ममनाचा शोध

शेरलॉक अँड माय होम : आत्ममनाचा शोध

googlenewsNext

प्रत्येकच व्यक्तीचे स्वत:चे असे वेगळे विश्व असते आणि प्रत्येकालाच त्यात रमायला आवडते. पण एखादा क्षण असा येतो, की स्वत: बनवलेल्या विश्वाला तडा जातो आणि त्या विश्वापलीकडचे जग उलगडणे भाग पडते. अशीच काहीशी कथा आहे शेरलॉक अँड माय होम या नाटकाची. हे नाटक जयदीप अविनाश कुलकर्णी या १५ वर्षांच्या मुलाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. बाबा, शाळा आणि त्याचा शेरलॉक नावाचा कुत्रा एवढेच जयदीपचे जग असते. पण एक दिवस या शेरलॉकचा खून होतो.
या शेरलॉकच्या खुन्याच्या शोधार्थ जयदीप त्याच्या विश्वातून बाहेर पडतो आणि मग सुरुवात होते जयदीपच्या आयुष्यात येणाऱ्या नवनवीन रहस्यांची. मिस्टीक स्टुडिओ आॅफ आर्ट्सने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकामध्ये साकेत राजे, दीपंकर पै, विराज सवाई, आशिष जोशी, ॠत्विक खलनेकर, पंकज वाथोडकर, रश्मी निलाखे, शिवानी सोनार, सायली पोटफोडे व शिवानी कऱ्हाडकर आदी कलाकार आहेत. नाटकाचे दिग्दर्शन दर्शन नाईक आणि शिवानी कऱ्हाडकर यांनी केले आहे.

Web Title: Sherlock and My Home: Self-Detection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.