‘शेरशाह’ चित्रपट आणि सिद्धार्थच्या जबरदस्त अभिनयावर होतोय कौतुकांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 09:57 AM2021-08-13T09:57:34+5:302021-08-13T09:58:27+5:30
Shershaah Movie : ‘शेरशाह’ ऑनलाइन रिलीज झाल्याच्या काही तासांतच, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani ) स्टारर ‘शेरशाह’ (Shershaah) काल अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला. चित्रपट ऑनलाइन रिलीज झाल्याच्या काही तासांतच, समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे नेटिझन्सकडून तर सोशल अकाऊंटवरून चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे, जणू सर्वत्र चित्रपटाचे वर्चस्व आहे.
#OneWordReview...#Shershaah: POWER-PACKED.
— taran adarsh (@taran_adarsh) August 12, 2021
Rating: ⭐️⭐️⭐️½#Shershaah salutes the valour, courage and bravery of #Kargil war hero Captain #VikramBatra, #PVC… Inspirational and emotional… A game changer for #SidharthMalhotra… Commanding act… Unmissable! #ShershaahReviewpic.twitter.com/ZtfoGObrL8
चित्रपटाला ‘पॉवर पॅक्ड’ म्हणत, ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श म्हणतात की, ‘शेरशाह’ कारगिल युद्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्राच्या (पीव्हीसी) शौर्याला आणि धैर्याला प्रेरणादायी आणि भावनिकपणे सलामी देतेय. सिद्धार्थ मल्होत्रा साठी हा चित्रपट गेम चेंजर ठरेल. उत्कृष्ट...
#Shershaah [3.5/5] : An inspiring story of #Kargil War Hero Capt #VikramBatra - A WINNER! @SidMalhotra at his career best performance.. @advani_kiara is fantastic..@vishnu_dir has recreated one of #India War Heroes majestic story with the realism and goosebumps worthy moments
— Ramesh Bala (@rameshlaus) August 12, 2021
आघाडीचे चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट केले, ‘कारगिल युद्धातील नायक कॅप्टन -विनर विक्रम बत्रा यांची प्रेरणादायी कथा! सिद्धार्थ मल्होत्राची त्यांच्या कारकिर्दीतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. कियारा आडवाणी उत्तम आहे. विष्णू वर्धन यांची भारताच्या युद्ध नायकांपैकी एक राजसी कथा, योग्य क्षणांसह यथार्थवाद आणि अंगावर काटे आणते.
तेव्हापासून हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. एवढेच नाही तर ‘शेरशाह’चे आयएमडीबी रेटिंग 9.4 आहे, जे दर्शवते की त्याने प्रेक्षकांसह देखील योग्य ताळमेळ बसवला आहे.
#Shershaah brought back the memories of Kargil war. @SidMalhotra brilliantly plays #CaptVikramBatra on screen, his career-best performance. Watch #ShershaahOnPrime this Independence Day weekend.
“Yeh Dil Maange more”— Ajay (@Ajayk_19) August 12, 2021
एका ट्विटर युजर ने पोस्ट केले की, ‘सिद्धार्थ मल्होत्राच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी! हा चित्रपट उत्कृष्टपणे अंमलात आणला गेलाय. ‘शेरशाह’ बघायला विसरू नका. कॅप्टन विक्रम बत्रा अमर आहेत, ‘ये दिल मांगे मोअर’....
just finished watching #Shershaah and im speechless. im crying and feeling literally blank. this movie was something else. exceptional. unbelievable.
— jheel 🌸 (@notsojheelous) August 11, 2021
im proud of you @SidMalhotra
you did it! #ShershaahOnPrimepic.twitter.com/fCXG8BQHah
दुसऱ्या एका युजरने ट्वीट केले, ‘आत्ताच ‘शेरशाह’ चित्रपट पाहिला आणि माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला अश्रू अनावर झालेत आणि मी खरोखरच ब्लँक झालोय. हा चित्रपट विलक्षण आहे. अविश्वसनीय अनुभव. मला तुझा अभिमान आहे सिद्धार्थ मल्होत्रा. तुम्हीं करून दाखवलं!
विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात शिव पंडित, हिमांशू मल्होत्रा, निकितिन धीर आणि साहिल वैद यांच्याही भूमिका आहेत.