Shershaah : कोण आहे कॅप्टन विक्रम बत्रांची प्रेयसी? कियारानं साकारलीयं भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:53 PM2021-08-13T12:53:35+5:302021-08-13T12:58:31+5:30

Shershaah : याला म्हणतात खरं प्रेम! ती आजही आहे अविवाहीत...

Shershaah movie who is dimple cheema fiance of vikram batra who refused to marry anyone after his death | Shershaah : कोण आहे कॅप्टन विक्रम बत्रांची प्रेयसी? कियारानं साकारलीयं भूमिका

Shershaah : कोण आहे कॅप्टन विक्रम बत्रांची प्रेयसी? कियारानं साकारलीयं भूमिका

googlenewsNext
ठळक मुद्देकारगिल युद्धाची सुरूवात झाली आणि विक्रम युद्धासाठी रवाना झाले. युद्धाच्या रणांगणात त्यांनी अपार शौर्याचं दर्शन घडवलं आणि लढता लढता देशासाठी शहीद झालेत. डिंपलसाठी हा मोठा धक्का होता.

कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजणारे शहीद  कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर  आधारित ‘शेरशहा’ (Shershaah) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) व कियारा अडवाणी (Kiara Advani ) यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा काल 12 ऑगस्ट ला अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला. सिद्धार्थने यात विक्रम यांची भूमिका साकारली आहे तर कियाराने विक्रम यांची प्रेयसी डिंपल चीमा हिची भूमिका जिवंत केली आहे. कॅप्टन विक्रम कारगिल युद्धात शहीद झालेत. पण त्यांची प्रेयसी डिंपल आजही त्यांच्या आठवणीत जगतेय.  कॅप्टन विक्रम शहीद झाल्यानंतर तिनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आजही ती अविवाहित आहे.

‘शेरशहा’चे शूटींग सुरू करण्याआधी कियारा स्वत: डिंपल भेटायला गेली होती. जणू आपण हिला खूप वर्षांपासून ओळखतो, असं डिंपलला भेटून कियाराला वाटलं होतं.
 कॅप्टन विक्रम आणि डिंपल या दोघांची भेट 1995 साली पंजाब विद्यापीठात झाली होती. ही त्यांची पहिली भेट होती. एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला. अर्थात हा अभ्याक्रम काही पूर्ण झाला नाही. कदाचित  कॅप्टन विक्रम व डिंपल यांची भेट घडवून आणण्यासाठी नियतीनं रचलेला तो एक खेळ होता.

विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर काहीच दिवसांत विक्रम यांना डेहराडून येथे असलेल्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला. पण तोपर्यंत विक्रम आणि डिंपल यांच्या प्रेमाला बहर आला होता. विक्रम प्रशिक्षणासाठी रवाना झालेत आणि डिंपल त्यांची प्रतीक्षा करत दिवस काढू लागली. दिवस आलेत, गेलेत आणि यादरम्यान डिंपलच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे लग्नासाठी तगादा सुरू केला. पण डिंपल विक्रम यांच्या पे्रमात आकंठ बुडाली होती. विक्रम यांची अवस्थाही काही वेगळी नव्हती.
कुटुंबीयांनी लग्नासाठी दबाब वाढवल्यावर अखेर एक दिवस डिंपलनं विक्रम यांना लग्नाबद्दल विचारलंच. त्याक्षणी विक्रम यांनी काय केलं असावं? तर पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला आणि त्या रक्तानं डिंपलची भांग भरली होती. तो आयुष्यातील सर्वात अनमोल क्षण होता, असं डिंपल आजही सांगते.
कारगिल युद्धाची सुरूवात झाली आणि विक्रम युद्धासाठी रवाना झाले. युद्धाच्या रणांगणात त्यांनी अपार शौर्याचं दर्शन घडवलं आणि लढता लढता देशासाठी शहीद झालेत. डिंपलसाठी हा मोठा धक्का होता. तो पचवणं सोपं नव्हतं. क्षणात सगळं संपलं होतं... अर्थात प्रेम कसं संपणार होतं? डिंपलनं पुढेकधीचलग्ननककरण्याचानिर्णयघेतलाआजहीतीअविवाहितआहे.

Web Title: Shershaah movie who is dimple cheema fiance of vikram batra who refused to marry anyone after his death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.