शिबानीचा ‘वर्ल्डकप फीवर’

By Admin | Published: March 25, 2016 01:17 AM2016-03-25T01:17:22+5:302016-03-25T01:17:22+5:30

‘ही पोरगी साजुक तुपातील हिला नवऱ्याचा...’ टाइमपास या चित्रपटातील या सुपरहिट आयटम साँगनं सर्वांच्या मनात जागा निर्माण केली. आजही लग्नकार्यात, पार्टीत वगैरे या गाण्याची धूम आहे.

Shibani's World Cup Fever | शिबानीचा ‘वर्ल्डकप फीवर’

शिबानीचा ‘वर्ल्डकप फीवर’

googlenewsNext

‘ही पोरगी साजुक तुपातील हिला नवऱ्याचा...’ टाइमपास या चित्रपटातील या सुपरहिट आयटम साँगनं सर्वांच्या मनात जागा निर्माण केली. आजही लग्नकार्यात, पार्टीत वगैरे या गाण्याची धूम आहे. पण, या गाण्यावर ठेका धरणारी मराठमोळी सुंदर अभिनेत्री शिबानी दांडेकर हिला टी-२० वर्ल्ड कपचा फीवर चढला आहे. शिबानीनं विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अशा अंदाजात इंडियन क्रिकेट टीमची जर्सी परिधान केलेला एक क्लिक सोशल मीडियावर अपडेट करून इंडियन टीमला प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या आहेत. शिबानीचं क्रिकेटप्रेम हे आपल्याला माहीतच आहे. २०११ ते २०१५ या कालावधीत होणाऱ्या आयपीएल मॅचेसमध्येदेखील शिबानीनं होस्टिंग केलं होतं, त्या वेळी या मराठमोळ्या होस्टच्या प्रेमात संपूर्ण जग पडले होतं. या क्रिकेट होस्टिंगनंतरच शिबानीला टाइमपासमधील या आयटम साँगवर ठेका धरण्याची संधी मिळाली होती.

Web Title: Shibani's World Cup Fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.