Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी करतेय नव्या आयुष्याची सुरुवात; राज कुंद्रासोबत लग्नाचा चुकीचा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 02:26 PM2021-09-18T14:26:34+5:302021-09-18T14:30:03+5:30
राज कुंद्रा(Raj Kundra) सोबत लग्न करणं शिल्पा शेट्टीचा चुकीचा निर्णय होता आणि आता ती नव्याने सुरुवात करत आहे असं तिला म्हणायचं आहे का? अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या पुढील वाटचालीबद्दल संकेत दिले आहेत. सोशल मीडियावर शिल्पा शेट्टीने टाकलेल्या पोस्टमुळे ती नव्याने आयुष्याची सुरुवात करणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. पोस्टमध्ये तिने चुकीचा निर्णय आणि बँड न्यू एडिंगवर भाष्य केले आहे. एका पुस्तकातील लिखाणाचा भाग तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामाध्यमातून शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आयुष्याची नवी सुरुवात करत असल्याचे संकेत देत आहे.
राज कुंद्रा(Raj Kundra) सोबत लग्न करणं शिल्पा शेट्टीचा चुकीचा निर्णय होता आणि आता ती नव्याने सुरुवात करत आहे असं तिला म्हणायचं आहे का? अशी चर्चा नेटिझन्स करत आहेत. या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टी कार्ल बार्ड्सचा एक कोट शेअर करत म्हणतेय की, कुणीही परत जाऊन नवी सुरुवात करू शकत नाही. कुणीही आतापासून नव्याने सुरुवात आणि एक अंत करू शकतं. त्यापुढे पुस्तकात लिहिलंय की आपण तासनतांस बसून आपण कुठे चुकलो? काय चुकीचे निर्णय घेतले? कुणाला दु:खं पोहचवले यावर विश्लेषण करू शकतो असं तिने सांगितले आहे.
काय लिहिलंय शिल्पा शेट्टीनं पोस्टमध्ये? वाचा
शिल्पा शेट्टी म्हणते की, आपण भूतकाळ बदलू शकत नाही मग कितीही त्याबद्दल विचार केला तरी. परंतु आपण नव्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. तेदेखील चांगले निर्णय, जुन्या चुकीकडे दुर्लक्ष करून जे आपल्या आसपास आहेत त्यांच्यासोबत नव्याने वाटचाल करू शकतो. आपल्याकडे स्वत:ला पुन्हा शोधणं आणि बदलणं यासाठी संधी आहे. माझ्या भूतकाळात जे घडलं त्या गोष्टीपासून माझ्यावर परिणाम होण्याची आवश्यकता नाही. माझी इच्छा आहे मी भविष्य बनवू शकते.
जेव्हापासून पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक केली आहे. तेव्हापासून शिल्पा क्रिप्टीक पोस्ट शेअर करत आहे. पोस्टच्या माध्यमातून शिल्पा शेट्टी तिच्या मनातील भावना व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. पोस्टमधून शिल्पा शेट्टी सांगू इच्छिते की, तिला पती राज कुंद्राच्या व्यवसायाबद्दल काही कल्पना नव्हती. अलीकडेच शिल्पा शेट्टी हिचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. शिल्पा शेट्टीचा दावा आहे की, पती राज कुंद्रा पोर्नोग्राफीचा व्यवसाय करत होते याची माहिती तिला नव्हती. कारण मी स्वत: माझ्या कामात खूप व्यस्त होते असं शिल्पाने म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा जबाब कोर्टात जमा केला आहे.